teacher & student 
अहिल्यानगर

विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक थेट बांधावर! 

सकाळ वृत्तसेवा

अकोले : नोकरी वाचविण्यासाठी आता शिक्षक शेताच्या बांधावर जाऊन विद्यार्थी शोधत आहेत. त्यांच्या शाळाप्रवेशासाठी धडपडत आहेत. तालुक्‍यात माध्यमिक व उच्च माध्यमिक 127 विद्यालये, तर 11 आश्रमशाळा आहेत. शाळांना दर वर्षी विद्यार्थीसंख्या कमी पडते. त्यामुळे शिक्षक आता थेट बांधावर जाऊन, "आमच्या शाळेत प्रवेश घ्या,' अशी गळ घालत आहेत. 

अकोले तालुक्‍यात आश्रमशाळांचे जाळे असून, त्यामुळे मुलींना शिक्षणाची संधी प्राप्त झाली. प्रत्येक गावात माध्यमिक विद्यालय सुरू झाले. शाळांची संख्या वाढत असताना, अलीकडे विद्यार्थिसंख्या कमी होत आहे. 20पेक्षा कमी पटसंख्या झाल्यास शिक्षक अतिरिक्त होतात. मग त्यांना इतर शाळांमध्ये सामावून घेतले जाते. तुकडी कमी होऊ नये, यासाठी शिक्षक सध्या जिवाचा आटापिटा करीत आहेत. 

पटसंख्या वाढविण्यासाठी संस्थाचालक काहीही सहकार्य करीत नाहीत. परिणामी, वर्गणी करून शिक्षक या विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य मोफत देतात. त्यांच्याकडून कोणतेही प्रवेश शुल्क घेतले जात नाही. कोरोना संकटामुळे सध्या शाळा सुरू झाल्या नसल्या, तरी पटसंख्या कायम राखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात गावोगावी शिक्षक भटकंती करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hailstorm Strong Wind : पाचोडसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित; आंबा-मोसंबी बागांचे नुकसान

Parli Vaijnath News : परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा त्रिशूल मध्य प्रदेशातील भाविकांकडून अर्पण

Pune FDA Raid : भेसळखोरांवर ‘एफडीए’ ची धाड; सत्‍तेचाळीस लाखांचा संशयित खवा, पनीर आणि तूप जप्त

Wagholi Fraud News : नोकरी देतो म्हणून दिवाळखोर कंपनीत नोकरी देऊन अनेकांची ४४ लाख रुपयांची फसवणूक; दोन कंपन्यांच्या मालकासह संचालकांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update: माळेगाव कारखान्याने शेतकऱ्यांना २०० रुपये कांडे पेमेंट केले जाहीर

SCROLL FOR NEXT