Three corona patients in Ahmednagar 
अहिल्यानगर

अरे देवा...नगर शंभरीकडे, कोरोनाबाधितांचा सिलसिला सुरूच

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा रोखण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, मुंबईसह बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्यांमुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख उंचावत चालला आहे. आज दिवसभरात एकूण 37 जणांच्या घशातील स्त्रावची तपासणी करण्यात आली. त्यातील 36 अहवाल प्राप्त झाले. त्यात मुंबईवरून आलेल्या तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. एक अहवालाचा निष्कर्ष न निघाल्याने पुन्हा स्त्राव घेण्यात येणार आहे. बाकी सर्व अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. 

बाहेरील जिल्ह्यातून आलेल्यांमुळे आता प्रशासनाची पुन्हा धावपळ सुरु झाली आहे. जिल्ह्यात पुणे, मुंबई आदी रेडझोनमधून अनेकजण जिल्ह्यात येऊ लागले आहेत. तेच आता कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 92 जण कोरोना बाधित आढळून आले.

सकाळी एकूण 17 जणांचे अहवाल आले. यामध्ये नगर शहर चार, भिंगार कॅम्प चार, कर्जत दोन, श्रीरामपूर एक, नेवासे एक, पाथर्डी एक असे एकूण 16 व औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील एक असे एकूण 17 अहवाल निगेटीव्ह आले होते. संध्याकाळी 19 अहवाल आलेले असून त्यात तीन जण पॉझिटिव्ह निघालेले आहे.

या बाधितांनामध्ये मुंबईतील भोईवाडा, परळ येथून चास येथील पिंपळगाव रस्ता (ता. नगर) येथे आलेली 24 वर्षीय व्यक्ती, घाटकोपर येथून केळेवाडी (ता. संगमनेर) यथे आलेली 32 वर्षीय व्यक्ती तर भाईंदर येथून वडाळा महादेव (ता. श्रीरामपूर) येथे आलेली 30 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. ही महिला काल (सोमवारी) कोरोनाबाधीत आढळून आलेल्या व्यक्तीची पत्नी आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे व जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT