tobacco seized by Tofkhana police  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : सव्वातीन लाखांची तंबाखू जप्त; तोफखाना पोलिसांची कारवाई

राज्यात तंबाखू, पानमसाला विक्रीस प्रतिबंध

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : तोफखाना पोलिसांच्या पथकाने सोमवारी (ता. ३१) रात्री साडेअकरा वाजता सिव्हिल हडको येथे छापा टाकून तीन लाख २२ हजार ५६ रुपयांची तंबाखू व पानमसाला जप्त केला.पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल दीपक आव्हाड यांच्या फिर्यादीवरून संतोष गोकुळ साळवे (वय ४७, रा. जे. जे. गल्ली, मंगलगेट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्यात तंबाखू, पानमसाला विक्रीस प्रतिबंध असताना त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने मुद्देमाल आढळून आला. एक लाख ६४ हजार १६० रुपये किमतीचा आरएमडी पान मसाला, ५४ हजार किमतीचे एम सेंटेड टोबॅको गोल्ड असे लिहिलेले तीन मोठे बॉक्स, २ हजार ३८८ रुपये किमतीची तंबाखू, ९ हजार ५०४ रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला, ७४ हजार ४४८ रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला लिहिलेले ३७६ पाऊच, असा मुद्देमाल हस्तगत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

SCROLL FOR NEXT