adv pratap dhakane esakal
अहिल्यानगर

तालुक्यासाठी आणलेल्या बाराशे कोटींचे काय? - ॲड. प्रताप ढाकणे

सकाळ डिजिटल टीम

पाथर्डी (अहमदनगर) : ''माझा मित्र (स्व. राजीव राजळे) असा कधीच वागला नाही. तुमच्या ताब्यात असणारी पंचायत समिती, नगरपालिका, खरेदी-विक्री संघ व वृद्धेश्वर साखर कारखाना या संस्था नेमके कोण चालवते? तालुक्यासाठी आणलेले बाराशे कोटी रुपये नेमके कुठे गेले, असे प्रश्‍न उपस्थित करून, तुमचे सल्लागार बदला, असा सल्ला केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे (adv pratap dhakane) यांनी आमदार मोनिका राजळे (mla monika rajale) यांना त्यांचे नाव न घेता दिला.

त्याचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे

येथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. ढाकणे बोलत होते. नगरसेवक बंडू बोरुडे, योगेश रासने, वैभव दहिफळे उपस्थित होते. ढाकणे म्हणाले, ‘‘तालुक्याच्या जडणघडणीत माधवराव निऱ्हाळी, बाबूजी आव्हाड, रावसाहेब म्हस्के यांच्यासह माजी मंत्री बबनराव ढाकणे व आप्पासाहेब राजळे यांचे योगदान मोठेच आहे. आज जे चाललेय ते बरे नाही. तालुक्यासाठी आलेले बाराशे कोटी खर्च केले असते, तर तालुक्याचे नंदनवन झाले असते. कोविडसाठी एक कोटी रुपयांचा निधी आमदारांना मिळाला. तो नेमके कुठे खर्च झाला? हे जनतेचे पैसे आहेत. त्याचा हिशेब जनतेला मिळाला पाहिजे.’’ पालिकेचा शहरस्वच्छतेचा ठेका मागील वर्षी ९६ लाखांना गेला. या वर्षी एक कोटी ८० लाखांना कसा दिला, मधले पैसे नेमके कोणाला मिळाले? बाजार समितीत एवढा गोंधळ केला, की मला ती ताब्यात घेऊन पश्चात्ताप वाटला. पंचायत समितीत चुकीच्या बिलाला नाही म्हणणाऱ्यांना तुम्ही कशी शिक्षा देताय? तुमचे सल्लागार बदला. गुंडगिरी करणारे पोसू नका. चोरून कारखान्यातील साखर विकायची व बँकेलाही फसवायचे प्रकार सुरू आहेत. वेळ आली तर पुरावे देईन. माझ्या माणसांनी पालिकेत चूक केली, तर त्यांचे राजीनामे घेतले. तुम्ही नेमके काय करता, समजतंय का? अशी टीका करीत ढाकणेंनी आगामी काळात अधिक तीव्रतेने विरोध करू, असे सांगितले.

किती खोटे बोलणार?

भगवानगड व पस्तीस गावांच्या पिण्याच्या पाणी योजनेबाबत आमदार मोनिका राजळे यांनी केलेली घोषणा किती फसवी आहे, हे येळीचे सरपंच संजय बडे यांनी उघड केले आहे. तुम्ही किती खोटे बोलणार? आता माझे सरकार आहे. ते खोटे बोलत नाही. मी भगवानगडाची योजना पूर्ण करणार आहे, असे ॲड. प्रताप ढाकणे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT