Why did former Pathardi corporator enter Corona patient's ward ... 
अहिल्यानगर

पाथर्डीचे माजी नगरसेवक का घुसले कोरोना पेशंटच्या वार्डात...

राजेंद्र सावंत

पाथर्डी : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित उपचार घेत असताना तेथे विनापरवाना जाऊन रुग्णांच्या बेडवर बसून त्यांच्या व स्वत्ःच्या जीवाला धोका निर्माण करण्याचे काम माजी नगरसेवक चाँद हुमायुन मणियार यांनी केले.

पोलिसांनी मणियार यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. या बाबत पोलिस कर्मचारी अतुल शेळके यांनी पोलिसात फिर्याद नोदंविली आहे. माजी नगरसेवक चाँद मणियार हे उपजिल्हा रुग्णालयात १९ जुलै २०२० रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गेले.

तेथे कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु असताना त्यांच्या बेडवर जाऊन बसले. तसेच स्वतःच्या रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य केले. म्हणून त्यांच्याविरुद्ध जिल्हाकारी यांच्या कोविड संदर्भातील आदेशाचे उल्लघन केले. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

शहरात कोविडची परिस्थिती गंभीर असताना लोक काळजी घेत नाहीत. नाईलाजाने पोलिसांना कायदेशीर कारवाई करावी लागत आहे. तहसीलदार नामदेव पाटील यांनी पोलिसांना सुचना देवुन कोणीही असो नियम मोडले की कडक करावाई झालीच पाहीजे असा आग्रह धरला आहे.

माणुसकीची भावना बाजुला ठेवा आणि कोरोनावर मात करण्यासाठी नियमांची कडक अमंलबजावणी करा असे पाटील यांनी सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT