Akola Accident News sakal
अकोला

Akola Accident News : धावत्या दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्याने अपघात ; विवाहीत तरुणी गंभीर जखमी

पतीसोबत दुचाकीवर घरी जात असताना विवाहितेची ओढणी गाडीच्या चाकात अडकली. यामुळे ती गाडीवरुन खाली पडली.

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : पतीसोबत दुचाकीवर घरी जात असताना विवाहितेची ओढणी गाडीच्या चाकात अडकली. यामुळे ती गाडीवरुन खाली पडली. खाली पडल्याने डावा हात मोडला असून ही विवाहिता गंभीर जखमी झाल्याची घटना पारस ते निमकर्दा मार्गावर शुक्रवारी ता. २२ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. तेजस्विनी भोजने असे गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

पारस येथील माहेर असलेली तेजस्विनी ही विवाहित महीला तिच्या पती सोबत पारस येथे माहेरी गेली होती. माहेरहून आज शुक्रवारी सकाळी एमएच ३० बि आर ८९०९ या क्रमांकाच्या दुचाकीवरून ते दोघेजण गावी जात होते.

त्यावेळी त्यांची दुचाकी निमकर्दा नजीक हरिभाऊ गव्हाणकर विद्यालया जवळ पोहोचताच धावत्या दुचाकीच्या चाकात तेजस्विनीची ओढणी अडकून पडली होती. ओढणी चाकात अडकल्याने ती दुचाकीवरून रस्त्यावर पडली. दुचाकी भरधाव असल्याने तिच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी विद्यालयाच्या परीसरात असलेले कुंदन लोंढे आदी तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. रिधोरा येथील कुंदन लोंढे या तरुणाने आपल्या ऑटोरिक्षात टाकून उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT