Akola Buldana News First incident in history, two constables positive police Thane closed, police colony with Thane sealed
Akola Buldana News First incident in history, two constables positive police Thane closed, police colony with Thane sealed 
अकोला

इतिहासातील पहिली घटना, दोन कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह पोलिस ठाणे बंद, ठाण्यासह पोलिस वसाहत सील

विवेक मेतकर

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा)  : टाऊन जमादार, एक कॉन्स्टेबलसह पोलिस स्कूल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील तीन महिला असे पाच जणांना कोरोना संसर्गाची लागण झाली असून मंगळवारी (ता. ४) पोलिस ठाण्याला कुलूप बंद करून संपूर्ण वसाहत सील करण्यात आली आहे. दरम्यान कंटेनमेंट झोन असेपर्यंत पोलिस ठाण्याचा कारभार सिंदखेड राजा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.


शहर व तालुका कोरोना संसर्ग हॉटस्पॉटकडे वाटचाल करीत आहे. दररोज तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शतक ओलांडले असून, दोन दिवसापूर्वी शहराचे टाउन जमादार त्यांच्या पत्नी व मुलीस कोरोना संसर्ग झाल्यानंतर काल पुन्हा एक पोलिस कर्मचारी व त्यांची पत्नी कोरोना बाधित झाले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

वसाहतीतील पाच जण झाल्याने पोलिस ठाण्यासह संपूर्ण वसाहत कंटेनमेंट झोनमध्ये आली आणि ठाण्याच्या आवारातील प्रवेशद्वारासह मुख्य दाराला कुलूप बंद करण्यात आले. कंटेनमेंट घेऊन असेपर्यंत पोलिस ठाण्याचा संपूर्ण कारभार सिंदखेडराजा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. आजवरच्या इतिहासात पोलीस ठाण्याला कुलूप लावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT