Akola cyber crime fake message If click on link account is hacked sakal
अकोला

अकाेला : सोशल मीडियावर फीशिंग मेसेज व्हायरल

लिंकवर क्लिक केल्यास अकाऊंट होते हॅक

संतोष गिरडे

शिरपूर जैन : अनेकांच्या व्हाट्स ॲप ग्रुपवर गेल्या काही दिवसापासून मोबाईल रिचार्ज वापरकर्त्यांना मिळवून दिला जाणारा मेसेज व्हायरल होत आहे, त्यात ५९९ रुपयांचा फ्री रिचार्ज आपणास मिळत असलयाचे सांगितले जाते. परंतु हा मेसेज फसवा आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते हॅक होण्याची शक्यता असते व बँक खाते रिकामे होऊ शकते. सायबर गुन्हेगारांचा फीशिंग मेसेज असल्याचे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हा मेसेज फेक म्हणजेच बनावट असून त्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलमधील डाटा सायबर हॅकर्सच्या हाती लागतो, दिलेल्या लिंकवर क्लिक केले असता एकूणच माहिती उघडते, ज्यात तुम्ही मोफत रिचार्जसाठी पात्र आहात असे नमूद असते. याप्रकारे नंतर एक एक करीत चार पाच प्रश्नांची उत्तरे विचारले जातात. त्यानंतर ही लिंक १५० लोकांना पाठविण्यास सांगितले जाते. अशा प्रकारे अनेक जण या फ्री मोहजाळ्यात अडकत आहेत. हा एक फीशिंग मेसेज असून यावर क्लिक करताच आपली पूर्ण माहिती हॅकरला प्राप्त होते.

यात व्हाट्सअप प्रोफाइल, मेल आयडी आणि आपल्या सर्व डिटेल व लोकेशन सुद्धा हॅकर्सच्या नियंत्रणात असते. यावर लिंक व क्लिक करताच आपल्या मोबाईलवर एक मालवेअर डाउनलोड होतो. याद्वारे तुमचा मोबाईल नंबर, तसेच व्हाट्स ॲपवर नियंत्रण करून ओटीपी सुद्धा मिळवू शकतो. यासंदर्भात सायबर पोलिसांनी एक पत्रक जाहीर केले आहे. अशा पद्धतीची कोणतीही योजना संबंधित कंपनीकडून घोषित केलेली नाही. नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवून लिंकवर क्लिक करू नये व आपली वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन केले आहे.

अज्ञात लिंकवर क्लिक करू नये

हल्ली बहुतांशी जणाच्या मोबाईलमध्ये ई वालेट वापरले जातात. पैशाच्या हस्तांतरणासाठी त्याचा वापर केला जात आहे, परंतु ऐनवेळी व्यवहार झाला नाही तर मग आपण असा प्रयत्न करतो की तो भामट्यासाठी पर्वणी ठरू शकतो. कोणत्याही अज्ञात लिंकवर जाणे धोकादायक ठरू शकते. सर्व गोष्टी फॉलो केल्या की फॉलो करणाऱ्याच्या ई वालेटची माहिती हॅकर्सच्या डेस्कटॉपला जाते. यातून मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक करून धोका पत्करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT