Akola: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; ...तर ५४ ग्रा.पं.मध्ये होणार पोटनिवडणूक Sakal
अकोला

Akola: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; ...तर ५४ ग्रा.पं.मध्ये होणार पोटनिवडणूक

जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. १११ सदस्य तर १४ सरपंचा पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

सकाळ डिजिटल टीम

अकोला - जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी १४ ग्रामपंचायतीमधील तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ४० अशा एकूण ५४ ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकांसाठी शुक्रवारी (ता. २५) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. संबंधित तालुक्यांचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही यादी प्रसिद्ध केली.

राज्य निवडणूक आयोगाचे २७ जुलै रोजी नुसार माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित व सन् २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतींमधील सदस्य, थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी १४ ग्रामपंचायतीमधील तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या ४० अशा एकूण ५४ ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकांसाठी रिक्त सदस्य पद व थेट सरपंच पदांच्या जागांचा निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार यादी पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात आली आहे.

सदर यादी शुक्रवारी (ता. २५) ग्रामपंचायत कार्यालय, तसेच संबंधित कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रभाग निहाय अंतिम यादी प्रसिद्धी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कधीही या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्या येऊ शकतो.

सार्वत्रिक व पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रा.पं.चा तपशील

- जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. १११ सदस्य तर १४ सरपंचा पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

- ४० ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यामध्ये सदस्यांसाठीची ५६ पदे व सरपंचांची तीन पदांसाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST चा मोठा निर्णय! बसचालकांवर आता साध्या वेशातील अधिकाऱ्यांची नजर राहणार, कारण काय?

Melatonin: शांत झोपेचे रहस्य! शरीरातील मेलाटोनिन हार्मोन नक्की काय काम करते ?

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये पुन्हा आंदोलन, आदित्य-अमित ठाकरे उपस्थित

Chas Dam Flood Release: चास कमान धरणातून २९,७९३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; ९९ टक्के भरलेले धरण, भिमा नदीला पूरस्थिती

Panvel News: एमएमआरडीएला मोठा झटका! पालिकेने १,२६० कोटींच्या निधीचा प्रस्ताव फेटाळला

SCROLL FOR NEXT