akola sakal
अकोला

अकोला : बोलेरो पिकअपच्या धडकेत ग्रामसेवकाचा मृत्यू

ते खामगाव पंचायत समितीत कार्यरत होते

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : चिखली ते बुलडाणा मार्गावर हातनी गावाजवळ आज रात्री पावणेआठ वाजेदरम्यान भरधाव बोलोरो पिकअपने ग्रामसेवकाच्या दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. राम नामदेवराव बाहेकर ( ३५ , रा . किन्होळा , ता . चिखली ) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . ते खामगाव पंचायत समितीत कार्यरत होते .

त्यांच्या वडिलांचेही अपघातात निधन झाल्याने वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर त्यांना ग्रामसेवकाची नोकरी मिळाली होती . ते खामगावकडून किन्होळा येथे परतत असताना बुलडाण्याकडून चिखलीकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपने बाहेकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली . बोलेरो पिकअपचा चालक घटनास्थळी वाहन सोडून पसार झाला . अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT