Vanchit Bahujan Aghadi  Esakal
अकोला

वंचितकडून 'डबल महाराष्ट्र केसरी' लोकसभेच्या आखाड्यात? कोण आहेत वंचितकडून जाहीर करण्यात आलेले उमेदवार...जाणून घ्या

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच वंचित बहुजन आघाडीने राज्यातील तीन मतदारसंघांतून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोल्यातून रिंगणात असतील.

सकाळ डिजिटल टीम

Vanchit Bahujan Aghadi Declared Candidate for Loksabha Election : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच वंचित बहुजन आघाडीने राज्यातील तीन मतदारसंघांतून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोल्यातून रिंगणात असतील.

वर्धा आणि सांगलीतूनही उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीसोबत ‘वंचित’ची बोलणी जवळजवळ फिसकटल्याचे मानले जाते. आम्ही अद्याप महाविकास आघाडीत नाहीत, असे सांगणारी वंचित बहुजन आघाडी २०१९ प्रमाणेच यावेळीही स्वबळावर निवडणूक लढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर, वर्धा मतदारसंघातून प्रा. राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून पैलवान चंद्रहार पाटील यांची नावे ‘वंचित’कडून रविवारी जाहीर करण्यात आली. आघाडीची बोलणी पूर्ण झाली नसतानाच उमेदवारांची नावे जाहीर झाल्यामुळे आघाडीच्या शक्यता मावळल्याचे मानण्यात येते. (Latest Marathi News)

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पातळीवरील चर्चेतून काही मार्ग निघण्याची शेवटची आशा महाविकास आघाडीला आहे; परंतु तशी शक्यता धूसर असल्याचे राजकीय वर्तुळातील मानले जाते. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत ‘वंचित’ने राज्यातील २७ जागांवर लढण्याची आपली तयारी असल्याचे सांगून संबंधित जागांची उमेदवारांसह यादी सादर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT