suicide  sakal
अकोला

Suicide news: डॉक्टर होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं! नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने शेतकरीपुत्राची आत्महत्या

नागपुरात आणखी चांगली तयारी करता येईल. या उद्देशाने तो येथे आला

सकाळ वृत्तसेवा

कारंजा : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ''नीट'' परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तालुक्यातील रामनगर पिंप्री फाॅरेस्ट येथील शेतकरी पुत्राने नागपूर येथे राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना नागपूरच्या वाठोडा पोलिस स्टेशन हद्दीत घडली.

पिंपरी फॉरेस्ट येथील शेतकरी तेजूसिंग कनिराम राठोड यांचा एकूलता एक मुलगा भावेश (वय १९) मागील एक वर्षापासून नागपुरात राहून ''नीट''ची तयारी करीत होता. त्याचे स्वप्न डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी तो दहावीपासूनच तयारीला लागला होता.

नागपुरात आणखी चांगली तयारी करता येईल. या उद्देशाने तो येथे आला व शिवसुंदरनगर येथे एका नातेवाइकाच्या घरी राहून अभ्यास करू लागला. मंगळवार १३ जूनला नीटचा निकाल लागला व त्यात त्याला ७२० पैकी ५८८ गुण प्राप्त झाले परंतू अपेक्षेनुरूप गुण न मिळाल्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगणार, या विचाराने तो अस्वस्थ झाला.

अशातच त्याने रात्री ११ वाजेनंतर आपल्या खोलीतील सिलिंगला दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. सकाळी तो नातेवाईकांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. भावेशचा लहान भाऊ सुध्दा चार वर्षांचा असतांना पाण्याच्या टाकीत बुडून मरण पावला होता.

भावेश हा लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचा, होतकरु व अभ्यासात हुशार होता. डाॅक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो जिद्दीने अभ्यास करीत होता. भावेशवर पिंप्री फॉरेस्ट येथे शोकाकुल वातावरणात १४ जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्या करण्यापूर्वी भावेशने इंग्रजीत तीन पानांची सुसाईड नोट लिहून आईवडिलांची क्षमा मागितली असल्याचे त्याचे नातेवाईकांकडून कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT