akola news The price of Shivbhajan plate again is Rs. 10, extra money will have to be paid from tomorrow 
अकोला

शिवभाेजन थाळीची किंमत पुन्हा १० रुपये, उद्यापासून माेजावे लागणार जादा पैसे

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरू केलेल्या शिवभाेजन थाळीसाठी गरजूंना येत्या १ एप्रिलपासून पुन्हा दहा रुपये माेजावे लागणार आहेत. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने हा दर १० रुपयांवरून पाच रुपये करण्यात आला होता.


गरीब व गरजूंसाठी शिवभोजन योजनेअंतर्गत १० रुपयात जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गतवर्षी घेतला होता. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याच्या मुख्यालयी ही योजना राबवण्यात आली. त्याअंतर्गत महापालिका क्षेत्रात दोन ठिकाणी थाळी केंद्र सुरू करण्यात आली.

त्यानंतर याेजनेची व्याप्ती वाढवत ग्रामीण भागातही केंद्र सुरू करण्यात आली. गतवर्षी मार्चमध्ये काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कडक टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे मजूर, स्थलांतरित, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची साेय व्हावी, यासाठी शिवभाेजन थाळीची किंमत १० रुपयांवरून पाच रुपये करण्यात आली. हा निर्णय सुरुवातीला ३० मार्च २०२० पासून पुढील तीन महिन्यांसाठी घेण्यात आला. नंतर याच निर्णयाला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. ही मुदत ३१ मार्च २०२० राेजी संपुष्टात येणार असल्याने १ एप्रिल २०२१ पासून थाळीची किंमत पूर्वीप्रमाणेच १० रुपये राहिल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आहे.
......................
अकोला जिल्ह्यातीलतालुकानिहाय केंद्र
तालुका केंद्रांची संख्या
अकाेला ०३
मूर्तिजापूर ०२
बार्शीटाकळी ०३
तेल्हारा ०२
बाळापूर ०१
अकाेट ०१
पातूर ०१

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 30 जूनपूर्वी 'हे' काम न केल्यास पुढील 2,000 रुपयांचा हप्ता अडकणार; कृषी विभागाचा इशारा

Fan Cooling Tips : सीलिंग फॅनची स्पीड कमी झालीये? नवीन पंखा विकत घेण्यापूर्वी करून बघा 'हे' काम, येईल एसीसारखी थंड हवा

FIFA WORLD CUP 2026: मृत्यूला हरवून 'तो' मैदानावर उतरला; वर्ल्ड कपमध्ये पहिला गोल करताच ढसाढसा रडला... कोण आहे Raúl Jiménez?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीस उद्या भिमाशंकर दौऱ्यावर; विकासकामे, सुरक्षा आणि भाविक सुविधांची करणार पाहणी

आता IRCTC वेबसाईट हँग होणार नाही! १५ जुलैपासून नवी प्रणाली लागू; तत्काळ तिकीट बुकिंगचा त्रास संपणार?

SCROLL FOR NEXT