akola news Use of social media to match marriage 
अकोला

विवाह जुळवण्यास सोशल मीडियाचा आधार

संतोष गिरडे

शिरपूर जैन (जि.वाशीम) : आजच्या धकाधकीच्या वेगवान काळात ‘चट मंगणी पट ब्याह’ पद्धतीकडे अनेकांचा कल आहे. अनेक वर-वधू बाहेरगावी नोकरी-व्यवसाय व काही कामानिमित्त राहत असल्याने, त्यांना घरी बोलावून पसंती नंतरच पुढील कार्यक्रम करावे लागत होते. त्याला फार वेळ जात होता,

मात्र आता मोबाईल मधील व्हाट्सऍपच्या माध्यमातून मुलगा-मुलगी एकमेकांना पसंती दर्शवतात. नातेवाईक, आई-वडिलांना सुद्धा फोटो पाठवतात. त्यामुळे फोटो पाहताच पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. असा हा प्रकार शहरी भागासह ग्रामीण भागातही सुरू झाला आहे.
मुला-मुलींचे विवाह पार पडणार असल्याने नातेवाईक एकमेकांसोबत देवाण-घेवाण कशा प्रकारे करता येईल? यातून मार्ग काढत आहे.

एकीकडे महाराष्ट्र शासन मुला-मुलींमध्ये समानता आणण्यासाठी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियान राबवत आहे. दिवसेंदिवस लग्नासाठी मुलगा-मुलगी मिळणे कठीण होऊ लागले, प्रत्येक आई-वडील आपल्या मुला-मुलींला नोकरी करणारा वधू-वर हवा अशी अपेक्षा करीत आहेत. दिवाळी नंतर लग्न कार्याची लगबग जोमात सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे पूर्वी मुलगा व मुलगी पसंत करण्यासाठी त्यांच्या घरी जावे लागत होते. नातेवाईक अथवा आई-वडिलांनी मुलगा-मुलगी पसंत केली असली, तरी पुन्हा मुलाला-मुलीच्या घरी पाठवावे लागत होते. मात्र आता विज्ञान युगाच्या व धावपळीच्या मध्ये बाजारात अँड्रॉइड चांगले मोबाईल मिळत आहेत.

या मोबाईल मध्ये व्हाट्सऍप व फेसबुकची सुविधा असल्याने काही क्षणातच एकमेका सोबत संपर्क होऊन, व्हिडिओ-फोटो डाऊनलोड करून पाठवल्या जात आहेत. ग्रामीण भागातील अनेक मुले-मुली नोकरी व्यवसाय किंवा विविध कंपन्याकडे कामानिमित्त शहराकडे गेलेले आहेत. त्यांना कामामुळे वेळही मिळत नाही.
----------------------
तंत्रज्ञानामुळे आला वेग
आई-वडील व नातेवाईक यांना मुलगा-मुलगी पसंत पडल्यावर गावी बोलावून घेणे. त्यानंतर एकमेकांना पसंत पडल्यानंतर पुढील सर्व कार्यक्रम आखले जात होते. परंतु, आता मोबाईल वरील व्हाट्सऍप वर मुला-मुलींची पसंती व पाहण्याचा कार्यक्रम आखल्या जात आहे. या तंत्रज्ञानामुळे लग्न कार्याला वेग आला आहे, तर मुला-मुलींना पाहण्यासाठी वेळ वाया घालवण्याऐवजी तडकाफडकी सर्व बाबी होऊ लागल्या आहेत. तेव्हा व्हाट्सऍप च्या माध्यमातून ‘चट मंगणी पट ब्याह’ अशी स्थिती रुजू होऊ लागली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT