Libraries.jpg 
अकोला

अरे व्वा ! आता वाचनालयच वाचकांच्या दारात; या नगरपरिषद प्रशासनाचा उपक्रम

श्रीकृष्ण शेगोकार

पातूर (जि. अकोला) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाढत्या आलेख लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने शासनाने व प्रशासनाने नेमून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी नगरपरिषद क्षेत्रातील जनतेच्या हिताचे व सुरक्षिततेचे भान ठेवत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे चित्र नगरपरिषद क्षेत्रात पाहायला मिळत आहे. याच क्रमात ग्रंथापाल ईश्‍वर पेंढारकरांकडून घरपोच पुस्तकांची सेवा देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

पाचशे सभासदांना होणार फायदा
गेल्या दोन अधिक महिन्यांपासून कोरोनाने कहर केला आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बंद असल्यामुळे नगर परिषद अंतर्गत चालणारे वाचनालय सुद्धा बंद आहेत. परंतु, वाचाल तर वाचाल यावर उक्तीला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत नगर परिषद मुख्याधिकारी सोनाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल ईश्वर पेंढारकर यांनी चक्क वाचनालच वाचकांच्या दारात नेण्याचा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. नगरपरिषद वाचनालयाचे पाचशेच्या जवळपास सभासद असून, वाचकांना वाचनाची सवय या ग्रंथालयामार्फत लागलेली आहे. परंतु, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे यादृष्टीने वाचनालय बंद होते.

उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
वाचनालयात सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, कथा-कादंबऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शिका अशी हजारो पुस्तके धूळ खात होती. परंतु, आता मुख्याधिकारी सोनाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल ईश्वर पेंढारकर यांच्या माध्यमातून वाचकांना द्वारपोच पुस्तक सेवा पुरवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आता वाचनालयाच्या सभासदांना वाचनालयात जाण्याची गरज राहिली नाही. वाचकांना पुस्तके हवी असल्यास ग्रंथपाल यांच्याशी संपर्क साधून आपल्याला हवे असलेल्या पुस्तकाची मागणी करून आपण द्वारपोच पुस्तके मिळवून आपल्या वाचनाचा छंद जोपासावा असे आवाहन मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी केले. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे व ग्रंथपाल ईश्वर पेंढारकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

एकेकाळी प्रफुल पटेलांचे PA ते आता राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी, कोण आहेत राजेंद्र जैन?

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

SCROLL FOR NEXT