elections 
अकोला

अकोला : ओबीसी संवर्गातील २७ जागेवरील निवडणुकीला स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक प्रक्रियेअंतर्गत ओबीसीसाठी राखीव २७ जागांच्या पोटनिवडणुकीला ‘आहे त्या टप्प्यावर’ स्थगिती देण्यात आली आहे. परंतु या निवडणुकीतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरु ठेवून पूर्ण करण्यात येईल, असेही आयोगाच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ३७६ पदांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का देणारा एक मोठा निर्णय सोमवारी (ता. ६) सुप्रीम कोर्टाने दिला. राज्य सरकारने ज्या अध्यादेशाद्वारे हे आरक्षण पुर्नस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. त्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. जोपर्यंत राज्य सरकार या आरक्षणासाठीची आकडेवारी आणि गरज एखाद्या गठित आयोगाच्या माध्यमातून सिद्ध करत नाही तोपर्यंत हे असं आरक्षण लागू करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

सदर आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून त्यामुळे जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींमध्ये होत असलेल्या ४०३ रिक्त पदासाठीच्या पोटनिवडणुकीतून ओबीसीसाठी राखीव २७ जागांना आहे त्या टप्प्यावर स्थगिती देण्यात आली आहे.

यापूर्वी बसला होता ओबीसींच्या १२३ जागांना फटका

स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्यामुळे ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची पदे रिक्त करण्यात आली होती. त्यानंतर सदर पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात आली. दरम्यान ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सुद्धा आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्यामुळे आणि नागरिकांच्या मागासप्रवर्गाचे एकूण आरक्षण २७ टक्क्यांपर्यंतच ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने तेव्हा दिले होते. त्यामुळे यापूर्वी ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या १२३ जागा आता खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. सदर जागांनंतर आता २७ जागा पोटनिवडणुकीला स्थगिती मिळाल्याने हा ओबीसीला सर्वात मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT