akola paschim vidhan sabha constituency sakal
अकोला

Akola News : अकोला पश्चिमची निवडणूक वांद्यात, उच्च न्यायालयात याचिका दाखल

आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसोबतच ही निवडणूक होणार आहे. मात्र आता ही पोटनिवडणुक होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पोटनिवडणुकीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकेवर शुक्रवारी (ता. 22) सुनावणी होणार आहे.

गोवर्धन शर्मा यांचे 4 नोव्हेंबर 2023 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने हा मतदारसंघातील आमदारपद रिक्त झाले. राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षाही कमी कालावधी असल्याने पोटनिवडणूक होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता.

अनेक राजकीय पक्षानी संभाव्य पोटनिवडणुकीची शक्यता लक्षात घेता अकोला मतदारसंघातून लढण्याची तयारी देखील सुरू केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले.

अकोला येथे राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवातही केली आहे. अशातच यावर पाणी फेरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही निवडणूक घेण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. अनिल दुबे यांच्यावतीने नागपूर येथील खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. जुगविजय गांधी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

केवळ चार महिने मिळणार

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी आहे. अशातच निवडणूक जाहीर करून केवळ पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. नवीन आमदार निवडून येईल, त्याचा अर्धाअधिक कालावधी हा आचारसंहितेत जाणार आहे.

4 जूनच्या निकालानंतर केवळ चार महिन्यांपुरता नव्या आमदाराचा कालावधी राहणार आहे. निवडणुकीसाठी सरकारी तिजोरीतून मोठया प्रमाणात पैसे खर्च होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर शुक्रवारी (ता.22) सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT