akola police returns stolen valuables worth 18 lakh sakal
अकोला

Akola News : चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळतात तेव्‍हा...

पोलिसांनी शोधलेला मुद्देमाल मालकांच्या हाती; १८ लाखांवर मुद्देमाल केला परत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : चोरी गेलेले दागिने परत मिळणे अशक्य... गाडीचा एकही सुटा भाग जागेवर नसेल... मोबाईल चोरीला गेला तर विसरून जा... असाच सर्वसामान्यांचा समज असतो...मात्र, चोरीला गेलेल्या वस्तू जेव्हा परत मिळतात तेव्हा चेहऱ्यावर समाधानाचे भाव तर उमटतातच... पण पोलिसांबद्दलचा आदरही द्विगुणीत होतो.

अकोला पोलिसांनी गेले महिनाभरात तब्बल १८ लाख ९१ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल शोधून तो मंगळवार, ता. १ ऑगस्ट रोजी मुळ मालकांना परत केला. जिल्हाभरातील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चोरी गेलेला मुद्देमाल शोधून तो फिर्यादिस परत करण्याची मोहीम अकोला पोलिसांतर्फे राबविली जात आहे.

त्या अनुषंगाने मंगळवारी एकूण १४ वाहने ज्याची किंमत आठ लाख ३५ हजार रुपये आहे, ती वाहनाच्या मालकांना परत करण्यात आली. याशिवाय तीन लाख ४२ हजार ९९४ रुपयांचे २३ मोबाईल, पाच लाख २१ हजार ८८१ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम व इतर एक लाख ९२ हजारांचा मुद्देमाल असा एकूण १८ लाख ९१ हजार ८७५ रुपायांचा मुद्देमाल पोलिसांनी मुळ मालकाला परत केली.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, गोपाल मुकुंदे, गणेश धुंपटववाड, कुंदन खराबे, सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, मुद्देमाल मोहरर यांनी पार पाडली.

निमकर्दा येथे सापडली एक लाखाची रोकड

निमकर्दा येथील पोलिस पाटील रामदास शेंडे यांना निमकर्दा येथील बस थांब्यावर एक लाख सहा जार रुपये रोख रक्कम असलेली बॅग आढळून आली होती. त्यांनी ती बॅग पोलिस स्टेशन उरळ येथे जमा केली. पोलिसांनी ती बॅग कोणाची आहे याबाबत शहानिशा करून शेगाव येथील राहुल शिरसाट यांचा शोध घेतला. त्यांची ही रोख रक्कम असल्याची खात्री करून उरळ पोलिस स्टेशनला बोलावून त्यांना ती परत करण्यात आली. पोलिस पाटील शेंडे यांच्या प्रामाणीपणाचे कौतुक करून पोलिस अधीक्षकांनी त्यांचे योग्य बक्षीस देवून त्यांना सन्मानित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

Bullock Cart Racing : 'किंग' ठरला सांगलीचा खिलार! बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठताच खोंडांची तुफान क्रेझ; लाख-दीड लाखाचा खोंड विकला जातोय 8 लाखांत

विशेष : इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म कसा भरावा?

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT