Akola Smart City Sakal
अकोला

Akola Smart City : ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे तत्काळ मंजूर करा; जिल्हाधिकारी कुंभार

Smart City Project : कर्ज मंजुरी प्रकरणे प्रलंबित ठेवल्यास फौजदारीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Akola : ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत रास्त कारणाशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कर्ज मंजुरी प्रकरण प्रलंबित राहिल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, जिल्ह्यातील बँका व प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट अकोला यांच्या आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवन येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी प्रकल्पाचे सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले. यावेळी स्मार्ट नोडल अधिकारी प्रदिप राऊत, तालुका कृषी अधिकारी शशिकीरण जांभरुनकर, अग्रणी बँक उपव्यवस्थापक घोरे, राहुल ठाकरे, सबंधित नोडल अधिकारी कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत विविध प्रक्रिया उद्योग उभे करून याद्वारे उत्पादक व खरेदीदारामध्ये दीर्घकाळ टिकाऊ, शाश्वत आणि व्यावसायिक संबंध विकसित करणे, भागीदारांना स्पर्धात्मक किंमत, उत्पादकता,

गुणवत्ता व विक्रीचे प्रमाण सुधारणे तसेच देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देणे, या उद्देशाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यतून २०२०-२१ ते २०२७-२८ असे एकूण सात वर्षाच्या कालावधीसाठी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी लागणारे आवश्यक तांत्रिक साहाय्य पायाभूत सुविधा यासाठी अर्थसहाय्य या प्रकल्पाचे माध्यमातून दिले जाते.

कर्ज न दिल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे

कर्जाच्या माध्यमातून निधी उभारणीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विविध बँकांकडे कर्जाची मागणी केली असून, बँकांकडे एक वर्षाहून अधिक कालावधी होऊनही अद्याप कर्ज मंजुरी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सबंधित बँकाना १५ दिवसात कर्ज मजुरी प्रकरणे निकाली न निघाल्यास संबंधित बँकांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT