Akola veterinary hospital bad Construction sakal
अकोला

अकाेला : पशु चिकित्सालयाचे बांधकाम निकृष्ट

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; पन्नास टक्के आम्हाला, पन्नास टक्के कामाला अशी परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा

मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील पशु चिकित्सालयाची इमारत मोडकळीस आली होती. आता त्याच जागेवर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परंतु कमिशनच्या हव्यासापोटी माणसाला सोडत नाहीत तर हा गुरांचा दवाखाना आहे. या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे केले तर गुरांना थोडी तक्रार करता येते. काहीसा असाच प्रकार मंगरुळपीर शहरातील पशु चिकित्सालयाच्या इमारतीच्या बांधकामात अधिकारी व कंत्राटदार यांनी पन्नास टक्के आम्हाला व पन्नास टक्के कामाला हा पायंडा रचून इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे.

मंगरुळपीर तालुक्यात शेतकरी मोठया संख्येने असून शेतकऱ्याची पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणात आहे. तरी आजू-बाजूला खेडयाचे प्रमाण लक्षात घेता मंगरुळपीर येथील पोलिस ठाण्याला लागून असलेल्या ठिकाणी पशु चिकीत्सालय दवाखान्याची इमारत इंग्रजकालीन होती. परंतु जुनी झालेली इमारत मोडकळीस आल्याने, त्या ठिकाणी नवीन इमारत उभारणी करण्यात येत आहे.

सध्या बांधकाम सुरू असून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन बांधकामाच्या गुणवत्तेबाबत विचारणा करीत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच कंत्राटदाराला कसेही बांधकाम केले तरी चालेल अशी हिरवी झंडी दिल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

ही इमारत जनावरांचा दवाखाना आहे, असा विचार करून व बांधकाम कसेही केले तरी जनावरे थोडी तक्रार करणार म्हणून कसेही करा आणि लवकर करा अशाच काही सूचना कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देऊन या कामात पन्नास टक्के आम्हाला व पन्नास टक्के कामाला देऊन काम करा असेच सुरू असलेल्या मंगरुळपीर येथील पशु चिकित्सालयाच्या इमारतीच्या होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT