Akola sakal
अकोला

Akola : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला विशेष गौरव पुरस्कार

ग्राहकांच्या अतूट विश्‍वासाचे प्रतीक; डॉ. संतोषकुमार कोरपे यांची पत्रकार परिषदेतून माहिती

सकाळ वृत्तसेवा

अकोला : दि अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला, शतकोत्तर करीत असलेल्या कार्याबद्दल १२ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित ग्रामीण सहकारी बँकेच्या राष्ट्रीय संमेलनात ‘विशेष गौरव पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

प्रगतीचा आलेख अनेक वर्षांपासून उंचावत ठेवून करीत असलेल्या बँकेच्या कार्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे गौरवद्गार यावेळी भारताचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमीत शहा यांनी काढले. बँकेला मिळालेला हा सन्मान सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, बँकेचे ग्राहक व हितचिंतकांच्या बँकेवरील अतूट विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी बुधवारी (ता.१९) आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

दि अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अकोला, वाशीम जिल्ह्यांतील शेतकरी तथा ग्राहकांच्या सेवेत ११३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. बँकेच्या शताब्दीनंतर बँकेचा प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत ठेवण्याकरिता संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे.

बँकेच्या प्रगतीचे विविध टप्पे गाठताना संचालक मंडळाने स्पर्धेच्या युगात बँक अधिकाधिक सक्षम रितीने कार्यरत राहील याकरिता विविध प्रकारच्या ठेवीच्या, कर्जाच्या योजना कार्यान्वीत केल्या आहेत. ग्राहकांकरिता डिजीटायझेशन अंतर्गत मोबाईल ॲप व फोन पे, गुगल पे तसेच विविध डिलेव्हरी चॅनल्समार्फत बँकेने ग्राहकांसाठी अनेक सेवासुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

बँकेवरील जनमानसातील विश्‍वासामुळे बँक सातत्याने प्रगतीपथावर राहून देश पातळीवर बँकेला विविध सन्मान प्राप्त झाले आहेत. देशसेवेचा एक भाग म्हणून बँक सुलभ कर्जावर मागेल त्याला सोलर सिस्टीम देण्याचा प्रयत्न करते व याचा प्रचार देखील करत आहे.

या प्रयत्नाचा दुसरा भाग म्हणून बँकेने स्वमालकीच्या सर्व इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टींग सिस्टीम बसवून जलसंधारणाच्या कार्यात देखील भाग घेतलेला आहे. ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजूर व बँकेचे ग्राहक यांना तालुक्याच्या ठिकाणी अगर शाखेचे ठिकाणी येण्यासाठीचा खर्च लागू नये तसेच बँकींग सेवा त्यांना यांच्या गावातच मिळावी याकरिता बँकेने २५० ग्राहक सेवा केंद्र अकोला व वाशीम जिल्ह्यात स्थापन केली आहेत.

या माध्यमातून ग्राहक सेवा अधिक सक्षम करण्याचा बँकेचा प्रयत्न असल्याचे पत्रकार परिषदेतून बँकेच अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी सांगितले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Raigad Flood Tribute: जांभूळपाडा महापुराला ३७ वर्षे; अंबा नदी प्रलयातील ८० जणांना स्मृतिस्तंभाजवळ अश्रुपूर्ण श्रद्धांजली

LPG Gas: 15 ऑगस्टपासून 10 किलोचा सिलिंडर मिळणार; सरकारी तेल कंपनीचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? मोदी सरकारची भूमिका काय?

Mumbai Rain: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पूरस्थितीमुळे २ जणांचा मृत्यू, तर २४४ जणांची सुटका; बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT