akola sakal
अकोला

Akola News : अकोला येथे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुन्हा संपावर

आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन, आशा स्वयंसेवकांच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची वाढ, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. सदर मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बाल विकास मंत्री, आरोग्य मंत्री, विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त यांनी मान्य केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शासनाने आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु लेखी आदेश, आश्वासन किंवा जी.आर. जारी न केल्याने आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवार (ता. १२) पासून संपाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांसह अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन, आशा स्वयंसेवकांच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची वाढ, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. सदर मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बाल विकास मंत्री, आरोग्य मंत्री, विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त यांनी मान्य केल्या आहेत. परंतु आजपर्यंत मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे व लेखी आश्वासन आणि शासनादेश जारी न करण्यात आल्याने आशा सेविकांनी शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सदर मोर्चा अशोक वाटिका येथून काढण्यात आला.

मोर्चात अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, आयटकच्या राज्य सचिव सुनीता पाटील, कॉ. नयन गायकवाड, मायावती बोरकर, सुरेखा ठोसर, दुर्गा देशमुख, सरोज मूर्तिजापूरकर, ज्योती ताथोड, सुनंदा पद्‍मने, आशा मदने, मंगला अढाऊ व हजारो आशा, अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचाही सहभाग

राज्यातील व जिल्ह्यातील दोन लाखावर अंगणवाडी सेविका, मदतनीस ४ डिसेंबर, २०२३ रोजी पासून बेमुदत संपावर आहेत. पेन्शन, ग्रॅज्युटी व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांना २६ हजार रुपये, मदतनीस यांना २० हजार रुपयांची मानधनात वाढ करण्यात यावी. अंगणवाडीसाठी पाच हजार रुपये ते आठ हजार रुपये भाडे मंजुर करावे. आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून सदर दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ रुपये व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा, या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT