crime crime
अकोला

प्रेयसीने बुरखा घातला म्हणून प्रियकराला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

अकोला : गायगाव येथील इंडियन ऑईल डेपोसमोर युवकाला काही लोक मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ (video viral) चांगलाच व्हायरल (social media) होत आहे. युवतीने बुरखा घातल्याने युवकाला नागरिकांनी मारहाण केली. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मारहाण झालेला युवक आणि बुरखा घातलेली युवती यांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही दुचाकीवरून जात होते. आपली ओळख पडू नये म्हणून युवतीने बुरखा घातला होता. काही युवकांनी त्यांना गायगाव येथील इंडियन ऑईल डेपोसमोर अडविले. यानंतर त्यांनी युवकास मारहाण करण्यास सुरुवात केली.

सात ते आठ दिवसांपूर्वीची ही घटना आहे. युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. युवकाला मारू नका अशी विनवणी सातत्याने युवतीकडून जमावाला केली जात होती. परंतु, जमावाने युवतीला बाजूला करून युवकास मारहाण केली. युवतीने हात जोडूनसुद्धा विनंती केली.

मात्र, जमावाने युवतीला बुरखा का घातला? अशी विचारणा करीत बुरखा जबरदस्तीने उतरवायला लावला. युवतीने जागेवरच खाली बसून बुरखा काढला. युवकास मारहाण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उरळ पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांपैकी दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चाैकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Wari Accident: जेजुरी अपघातानंतर आरोग्य विभागाची युद्धपातळीवर धाव; मृत वारकऱ्यांचे पार्थिव मूळ गावी पोहोचवण्याची शासनाची व्यवस्था

Latest Marathi News Live Update : जून २०२६ मधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर ४.३८% आहे

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT