जन्मदात्याच्या स्मृती जपण्यासाठी मृणालने बांधले वडिलांचे मंदिर ! sakal
अकोला

जन्मदात्याच्या स्मृती जपण्यासाठी मृणालने बांधले वडिलांचे मंदिर !

अरुण जैन

बुलडाणा : सर्वसाधारणपणे मुलगा आपल्या वडिलांचे नाव उज्वल करतो, पुढे चालवितो असे म्हटले जाते परंतु एका ज्येष्ठ पत्रकाराची मुलगी मृणाल सोमनाथ सावळे हिने आपल्या वडिलांचे त्यांच्या आवडत्या शेतात मंदिर बांधून त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देशभरातील कदाचित पत्रकाराचे हे पहिले स्मृतिमंदिर असावे.

बुलडाण्यातील धडाडीचे पत्रकार सोमनाथ सावळे यांचे गेल्यावर्षी अचानक निधन झाले. वडील मुलींच्या विवाहापूर्वीच निघून गेल्याने संपूर्ण कुटुंबच सैरभैर झाले.

त्यानंतर त्यांची लाडकी लेक मृणाल हिने आपल्या वडिलांचा वारसा व नाव पुढे चालावे यासाठी प्रयत्न सुरू केले. डोंगर शेवली येथील त्यांच्या आवडत्या शेतात त्यांचे एक स्मृती मंदिर बांधावे असा विचार तिच्या मनात आला. त्यानंतर तिने तातडीने या कामाला सुरुवात केली आणि त्यांच्या जाण्याला वर्ष व्हायच्या आतच हे मंदिर उभे करून दाखविले आणि एक मुलगी आपल्या वडीला साठी काय करू शकते याचा आदर्श दाखवून दिला. याशिवाय तिने आई सुरेखाताई सावळे यांच्या पुढाकारातून यावर्षीपासून वडील सोमनाथ सावळे ज्या शाळेत शिकले त्या शाळेतील हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी वडिलांच्या नावाने एक पुरस्काराची रक्कम देण्यालाही सुरुवात केली आहे.

....जग दाखवलं तुम्ही,

खेळायला शिकवलं तुम्ही

.....हातात हात घेउन,

चालायला शिकवलं तुम्ही

...मग का बाबा अर्ध्यावरती

का सोडून गेला तुम्ही?

या भावनेतून तिने वडिलांच्या स्मृती जोपासण्यासाठी हे मंदिर उभारले आहे. त्यासाठी राजस्थानातून वडिलांची हुबेहूब मूर्ती देखील तयार करून घेतली आहे. भावी काळातील मुलींची पिढी तिचा आदर्श नक्कीच घेतील.

संपूर्ण देशभरात कुठेही पत्रकाराचे मंदिर उभारलेले ऐकिवात नाही. दक्षिणेमध्ये नायक, नायीकांची मंदिरे आपल्याला दिसतात. यामुळे कदाचित लेखणीच्या माध्यमातून आपली नवी ओळख तयार करणार्‍या पत्रकाराचे हे पहिलेच स्मृतीमंदिर असावे.

असे आहे मंदिर

डोंगर शेवली ते डोंगर खंडाळा या मार्गावर स्व. सोमनाथ सावळे यांचे स्मृति मंदिर साकारण्यात आले आहे. त्यांच्या अस्थींची प्राणप्रतिष्ठा करून त्यावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. सुमारे साडेचार फुटांची संगमरवरी दगडाची मूर्ती बनलेली आहे. या मूर्तीमध्ये त्यांचे प्रखर डोळे, रुबाबदार मिशा आणि पांढरा शुभ्र पोशाख तंतोतंत साकारण्यात आला आहे. साहेबांच्या खिशात पत्रकारितेचे चिन्ह दर्शविणारा पेन या मूर्तीत लक्ष वेधून घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT