buldhana Crime Teacher arrested for abusing school girl crime news Sakal
अकोला

Buldhana Crime : शाळकरी विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक

बुलडाणा पोलिसांनी वासनांध शिक्षकाला अटक केली असून त्याची बोलेरो कार सुद्धा जप्त केली

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने एका १३ वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याचा प्रकार आज मंगळवारी (ता. ७) उघडकीस आला. मलकापूर मार्गावरील बालाजी मंदिर परिसरात एका वाहनात विद्यार्थीनीसोबत त्याने हे दुष्कृत्य केले. सततच्या अत्याचाराने त्रस्त १३ वर्षीय पीडितेने अखेर तक्रार दाखल केली. बुलडाणा पोलिसांनी वासनांध शिक्षकाला अटक केली असून त्याची बोलेरो कार सुद्धा जप्त केली आहे.

गुरुशिष्य नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सतीश विक्रम मोरे (वय ४१) असे आरोपीचे नाव असून तो मोताळा तालुक्यातील एका शाळेत शिक्षक आहे. गेल्या वर्षीपर्यंत पीडित विद्यार्थिनी मोरे यांच्याच शाळेत शिकत होती. आता ती वस्तिगृहात राहून बुलडाणा शहरातील शाळेत शिकत आहे.

पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास पीडिता शाळेत जात असताना सतीश मोरे हा बोलेरो कार घेऊन तिला रस्त्यात भेटला. त्याने पीडितेला थांबवून तिची विचारपूस केली व तुला शाळेत सोडतो, असे सांगून कारमध्ये बसवलं. मात्र मोरेने कार शाळेत नेलीच नाही.

शाळेतल्या कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतांनाचे पीडितेचे फोटो असल्याचे सांगून मोरेने कार मलकापूर मार्गावरील बालाजी मंदिराजवळ नेली व तेथे त्याने कारमध्येच पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर त्याने पीडितेला वस्तिगृहाजवळ आणून सोडले व घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली, असेही या तक्रारीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT