buldhana sakal
अकोला

बुलडाणा : स्वराज्य ध्वजाचे मातृतीर्थमध्ये स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्या स्वराज्य ध्वज संकल्पनेला जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्या स्वराज्य ध्वज संकल्पनेला जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्वराज्यध्वज मोहिमेच्या दुसरा टप्पा मातृतीर्थ सिंदखेड राजातून सुरुवात झाली आहे.सिंदखेड राजा येथे पोहोचल्या नंतर जिजाऊ यांच्या जन्मस्थानी स्वराज्य ध्वज प्रतिमेचे पूजन करण्यात आले महाराष्ट्रातील युवा आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ७४ मीटर उंच असा जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज साकारला आहे. सर्व धर्माचे प्रतीक असलेल्या या झेंड्याच्या रथाचे मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्माने पावन झालेल्या भूमीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले.

स्वराज्य ध्वज प्रतिमेचे प्रतीकात्मक पूजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वराज्य ध्वज हा शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच थरांमधून प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील ३६ जिल्हे आणि ६ राज्यांसह १२ हजार किलोमीटर असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी,नगराध्यक्ष सतीश तायडे, उपनगराध्यक्ष विजय तायडे,राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव,महिला जिल्हाध्यक्ष सौ.अनुजाताई पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे,नगरसेवक गणेश झोरे, नरहरी तायडे, श्याम मेहत्रे, राजू आप्पा बोंद्रे, जगन मामा सहाने,मधुकर गव्हाड, सतीश काळे, महेश पवार, सिद्धार्थ जाधव, प्रेम कोरडे, संजय मेहेत्रे, कैलास मांटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संचालन ॲड. संदीप मेहेत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

Marathi News Live Updates : डीजे बंदीच्या मागणीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, बापटांबाबत काय म्हणाले?

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

SCROLL FOR NEXT