Akola News sakal
अकोला

Akola News : उद्योजकांची पिळवणूक थांबवावी;एमआयडीसी प्लॉट ओनर असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी कार्यालय अमरावती येथे उद्योजकाची होत असलेली पिळवणूक व प्रादेशिक अधिकारी कडून भ्रष्टाचार सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी कार्यालय अमरावती येथे उद्योजकाची होत असलेली पिळवणूक व प्रादेशिक अधिकारी कडून भ्रष्टाचार सुरु आहे. या प्रकारामुळे उद्योजक त्रस्त झाले असून या गंभीर बाबीकडे लक्ष देवून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी एमआयडीसी प्लॉट ओनर असोसिएशनचे उपाध्यक्ष तपस्सु मानकीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनातून केली आहे.

संघटनेकडे अनेक उद्योजकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. प्रादेशिक कार्यालय अमरावती येथे भूखंडा संबंधित सामान्य कार्य करण्याकरिता फक्त दलालांच्या माध्यमातून मोठी रक्कम घेऊनच कार्य केले जातात तसेच उद्योजक स्वत: प्रादेशिक अधिकारी यांना भेटल्यावर सुद्धा विशिष्ट एजंटला भेटण्याचे आदेश श्री पारधी यांचे कडून दिला जातो.

हा अधिकारी कार्यालयीन वेळेत कार्यालय बसत नसून उद्योजकांना वेगळ्याच ठिकाणी बोलावतात. न भेटल्यावर कार्यालयात उद्योजकांशी उद्धटपणे बोलतात व सर्रास पैशाची मागणी करतात पैसे न दिल्यास उद्योजकांचा अपमान हा मुजोर अधिकारी करत असल्याच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत.

संघटनेचे पदाधिकारी प्रादेशिक अधिकारी यांना भेटले असता, ते म्हणतात मी प्रत्येक महिन्याला मोठी रक्कम मुंबई येथील अधिकाऱ्यांना देत असल्याने क्षेत्र व्यवस्थापक असून सुद्धा इतके दिवसपासून प्रादेशिक अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार माझ्याकडे देण्यात आला आहे, मला मुख्यालयाकडून संरक्षण प्राप्त आहे व माझे कोणी ही काही बिघडू शकत नाही. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचा वेळीच बंदोबस्त करून अमरावती येथील प्रादेशिक कार्यालयात प्रभारी न देता पूर्ण वेळ प्रादेशिक अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT