Accident sakal
अकोला

Accident : कंटेनर व दुचाकीच्या विचित्र अपघात; एकाच परीवारातील तीन जण ठार, तर अन्य तिघे जण जखमी

विचित्र अपघातात अपघातात एकाच परीवारातील तिघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर - दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरुन खाली पडलेल्या तिघे जणांना भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना बाळापूर ते वाडेगाव दरम्यान अकोला टि पॉईंटवर सोमवारी रात्री साडे सात वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एकाच परीवारातील तिघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार बाळापूर येथील रहिवासी शेख. सादीक शेख रज्जाक (४५), शेख खालीद शेख रज्जाक (४४) व शेख माजीद शेख सादीक (२४) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेही एकाच परीवारातील आहेत. आज सोमवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हा भिषण अपघात घडला आहे.

मृतक हे आपल्या एमएच ३० बि यू ०५३२ या दुचाकीने बाळापूरकडे येत होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही महामार्गाच्या मधोमध दुचाकीवरुन खाली पडले. या दरम्यान बाळापूरकडून पातूरकडे जाणारा भरधाव कंटेनरने या तिघांना चिरडत पुढे निघून गेला.

अचानक तिघेही महामार्गावर पडल्याने कंटेनर चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा भिषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलिस चौकीचे सहा. पोलीस उपनिरीक्षक पंकज कांबळे, पोलीस कर्मचारी अक्षय देशमुख ,अंकुश मोरे,राधेश्याम पटेल, रफीक शेख व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

एक तास वाहतूक विस्कळीत

या भिषण अपघातामुळे वाडेगाव ते पातूर मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. पोलिसांनी तातडीने तिघांचे मृतदेह अकोला येथे रवाना करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे बाळापूर शहरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी जबाबदारी असलेल्या कंटेनर चालकाला कंटेनरसह ताब्यात घेतले आहे. पुढील तपास बाळापूर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT