omicron Sakal media
अकोला

नागपूरनंतर बुलडाण्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; विदर्भात दोन रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

बुलडाणा : कोरोनाचा (Corona Virus) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा (Omicron Variant) रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळून आला आहे. नागपुरात ५ डिसेंबर रोजी ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद केली गेली होती. त्यानंतर दहा दिवासांनी म्हणजे १५ डिसेंबर रोजी बुलडाण्यात एक रुग्ण आढळून आला. रुग्णाला कुठलीही गंभीर लक्षणे नसल्याची माहिती आहे. आता विदर्भात एकूण दोन रुग्ण झाले आहेत.

दुबईहून बुलडाणा शहरात आलेला ६५ वर्षीय व्यक्ती ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. रुग्णाची ९ डिसेंबर रोजी कोरोना चाचणी करून नमुने ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याच्या अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. रुग्णाला कुठलीही गंभीर लक्षणे नसल्याची माहिती आहे.

बुलडाण्यात (Buldhana District) आढळलेल्या ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) रुग्णानंतर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या २१ झाली आहे. ओमिक्रॉनने आता वेगाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७७ देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. देशात ओमिक्रॉन मोठ्या प्रमाणात पसरत आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये ओमिक्रॉनचे आणखी दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ५९ वप गेलेली आहे.

प्रशासनाचे बारकाईने लक्ष

रुग्णाची प्रकृती ठणठणीत आहे. जिल्ह्यातील नागिराकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ओमिक्राॅन संसर्ग वाढू लागल्यानंतर परदेशातून आलेल्या नागरिकांवर जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष होते. या व्यक्तीच्या संपर्कातील इतर व्यक्ती निगेटिव्ह आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फुल ड्रामा! तिसऱ्या अम्पायरने फलंदाजाला OUT दिले, सहकारी डग आऊडमध्ये 'आंदोलना'ला बसले; पुढे जे घडले त्याने सारेच चक्रावले

काय? सेलेब्रिटींसोबत दिसणारा ऑरी करतो लाखोंच्या घरात कमाई? एका रीलसाठी घेतले ७६ लाख; म्हणतो- गेल्याच महिन्यात...

Pune Crime : पुण्यात संतापजनक घटना ! पोटच्या मुलांनीच वृद्ध आई-वडिलांना जमिनीसाठी भररस्त्यात दांडक्याने केली मारहाण, घटनेचा व्हिडिओ समोर

“गणा धाव रे…” सनई चौघडे’च्या टीमचा कोकणात बाल्या डान्स; Viral Video

Mumbai News: 'बार्बेक्यू नेशन'मध्ये डेझर्टच्या प्लेटवर झुरळ; ग्राहकाकडून स्वच्छतेबाबत चिंता; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT