crime sakal
अकोला

अकोला : तांदूळ खरेदीच्या नावाखील चोरांची टोळी सक्रिय

भारती प्लॉटमधील घटना; सावध राहण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

अकोला : चोरांची टोळी अकोला शहरात तांदुळ खरेदीच्या नावाखाली फिरत आहे. अशीच एक घटना डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भारती प्लॉट येथे घडली. एका घरात तांदूळ मागण्यासाठी आलेल्या दोन युवकांनी याच घरातील टेबलवर ठवलेले सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

भारती प्लॉट येथील रहिवासी कविता विजय गोखले या त्यांच्या घरासमोर उभ्या असताना दोन पुरुष त्यांच्याकडे आले. घरातील जुने धान्य तांदूळ , गहू किंवा इतर जे खराब झाले असेल ते चांगल्या भावात आम्ही खरेदी करतो असे आमिष त्यांना दिले. त्यामुळे महिला घरातील जुने तांदूळ काढण्यासाठी आत गेल्यात. याची संधी साधत दोन चोरट्यांनी घरातील टेबलवर ठेवलेले सोन्याचे दागिने घेवून पळ काढला. गोखले या दोघांना शोधण्यासाठी आल्या असता त्यांच्या घरातील टेबलावरील दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरातील नागरिकांसोबत चोरट्यांचा शोध सुरू केला, मात्र तोपर्यंत दोघेही पसार झाले होते.

या प्रकरणाची तक्रार रात्री उशिरा डाबकी रोड पोलिसांकडे करणार असल्याची माहिती गोखले यांनी दिली. अशा प्रकारे चोरीच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तींना घरात येण्यास मज्जाव करून आपली व आपल्या संपत्तीची सुरक्षा करण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. असे असतानाही नागरीक दोन पैशांच्या लालसेपोटी मोठा धोका पत्कर आहेत. नागरिकांच्या या बेसावधपणाचा चोरटे फायदा घेताना दिसत आहे. पोलिसांनी अशा संशयीतांवर अंकुश लावण्यासाठी गस्त वाढविण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मित्रांनीच केला घात! मित्राच्या पत्नीसोबतच २ मित्रांचं नको ते कृत्य, ४ वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी; विरारमध्ये खळबळ

Sugarcane Price Protest: तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवू; महाडिक ; ‘राजाराम’वर ट्रॅक्टर-ट्रॉल्या रोखून ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Latest Marathi News Live Update : रशियन कच्च्या तेलाबाबत भारताची मोठी रणनीती, दीर्घकालीन करारांची घाई नको; रुपया मजबूत करण्यासाठीही ठरू शकतो दिलासा

बाजूला हो ना... फराह खानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार; Viral Video पाहून नेटकरी संतापले; म्हणतात-

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

SCROLL FOR NEXT