Employees of two property brokers in the revenue department have also been present as witnesses in various transactions 
अकोला

महसूल विभागाच्या ‘त्या’ जोडीने जमविली लाखोंची माया; नातलगांच्या नावे घेतली शेती, संपत्ती खरेदी-विक्रीमध्ये दिली साक्ष

सदानंद खारोडे

तेल्हारा (अकोला) : खुले भूखंड व इमारतीच्या खरेदी-विक्रिच्या माध्यमातून महसूल विभागाच्या ‘त्या’ दोन प्राप्रर्टी ब्रोकर कर्मचाऱ्यांनी लाखोची माया जमवली. अनेक ठिकाणी नातलगांच्या नावे शेती, भुखंड खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. महसूल विभागातील या जोडीने खरेदी-विक्रीच्या अनेक व्यवहारात साक्षीदार म्हणूनही उपस्थिती लावली आहे.

तालुक्यातील महत्त्वाचा विभाग म्हणून गणल्या जाणाऱ्या महसूल विभागाच्या तहसील कार्यालयाचा कारभार पार ढेपाळला आहे. कार्यालयातीलच कर्मचारी कर्तव्याच्या वेळेत कामाला दांड्या देत असल्याने कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिक्त दिसतात. याच कार्यालयात कार्य करणारे दोन कर्मचाऱ्यांनी महसूल विभागातील नोकरीसह प्रॉपर्टी ब्रोकरचा धंदा उघडला आहे. कार्यालयीन वेळेतच कार्यालयातून दांडी देत भूखंड खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थाची भूमिका बजावित कमिशनच्या रुपात लाखो रुपये गोळा करण्यात ही दोघे व्यस्त आहे. त्यातून जमविलेल्या लाखोंच्या मायेतून नातेवाईकांच्या नावावर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी शेती खरेदी केली आहे. 

स्वतःच्या नावाने सुद्धा तालुक्यात अनेक ठिकाणी भूखंड खरेदी केले आहेत. तालुक्यातील अनेक प्लॉट व शेती खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये यांनी साक्ष दिली असल्याची माहिती समोर येत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाकडून याची चौकशी केल्यास सत्य समोर येऊ शकते. साक्ष देतानाच्या तारखेला या कर्मचाऱ्यांनी सुट्टीचा अर्ज टाकला होता काय, हे तपासल्यास वास्तव समोर येईल. रेती तस्कर विरोधात शस्त्र उपसणारे अधिकारी या कर्मचाऱ्यांची गय का करतात? असा प्रश्न समोर येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT