Akola Gajanan Maharaj Palkhi  Sakal
अकोला

Akola Gajanan Maharaj Palkhi : ‘श्रीं’चा पालखी सोहळा अकोला शहरातून पंढरीकडे मार्गस्थ

श्री संत गजानन महाराज श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूर पालखी सोहळा १३ जून रोजी रवाना झाल्यानंतर वारकऱ्यांचा अकोला शहरात शनिवारी (ता.१५) व रविवार (ता.१६) असे दोन दिवस मुक्काम होता.

अनुप ताले

Akola News : कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठोबाचे।। असे म्हणत हजारो वैष्णव भगव्या पताका उंचावत अकोला शहरातून पंढरीकडे सोमवारी (ता.१७) मार्गस्थ झाले. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव आणि पातूर येथे पुढील दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहणार असून, त्यानंतर वाशीम जिल्ह्यात प्रवेश करेल. अकोला शहरातील दोन दिवसांच्या सेवाभावाने ‘श्रीं’च्या पालखीतील वारकरी भारावून गेले.

श्री संत गजानन महाराज श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूर पालखी सोहळा १३ जून रोजी रवाना झाल्यानंतर वारकऱ्यांचा अकोला शहरात शनिवारी (ता.१५) व रविवार (ता.१६) असे दोन दिवस मुक्काम होता.

या दोन दिवसात अकोला शहरातील भाविकांनी पालखीचे भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत केले. दोन दिवसांतील अकोलेकरांच्या सेवेने वारकरी भारावून गेले. या पायदळ वारीत सहभागी ७०० हून अधिक वारकरी व सेवेकऱ्यांना सोमवारी (ता.१७) सकाळी अकोला शहरातून निरोप देण्यात आला.

सुखालागी करीसी तळमळ।

तरी तु पंढरीसी जाय एक वेळ।।

मग तु अवघासी सुखरुप होसी।

जन्मोजन्मी चे दुःख विसरसी।।

या संत नामदेव महाराजांच्या ओळीप्रमाणे शेगाव येथून निघालेल्या श्रींच्या ५५ व्या पंढरपूर पायदळ वारीचा सोहळा बघून अकोलेकरही भारावून गेले. सोमवारी पालखी सोहळा गोरेगाव, भरतपूर मार्गे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे विसावला. मंगळवारी सकाळीच पालखी सोहळा पातूरकडे रवाना होईल. त्यानंतर बुधवारी पालखी वाशीम जिल्ह्यात प्रवेश करेल.

अकोल्यात दोन ठिकाणी मुक्काम

श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेल्या पालखीने दि.१४ जून रोजी अकोला जिल्ह्यात प्रवेश करीत भौरद येथे मुक्काम केला. त्यानंतर १५ जून रोजी अकोला शहरात प्रवेश करीत मुंगीलाल बाजोरिया हायस्कुलच्या प्रांगणात मुक्काम केला. १६ जून रोजी पहाटेच शहरातील विविध भागातून मार्गस्थ होत पालखी सोहळा हरिहरपेठ येथील टाऊन स्कुलच्या प्रांगणात विसावला. या दोन दिवसाच्या मुक्कामात अकोल्यातील लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT