Gram Panchayats sakal
अकोला

अकोला : ग्रामपंचायत पोटनिवडणूक; आतापर्यंत २८ अर्ज दाखल

६ डिसेंबरच्या सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार २०० ग्रामपंचायतींच्या ४०३ रिक्त पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यापासून आतापर्यंत २८ अर्ज दाखल झाले आहेत.

राज्‍य निवडणूक आयोगाचे पत्र १७ नोव्‍हेंबर २०२१ अन्वये निधन, राजिनामा, अर्नहता किंवा इतर अन्‍य कारणांमुळे ग्रामपंचायतीमधील रिक्‍त झालेल्‍या पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींमध्ये ४०३ पद रिक्त असल्याने त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी ३० नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र सादर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान (ता. ३) डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबरपर्यंत सकाळी असल्याने शेवटच्या दिवशीच अधिक उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

छाननी ७ डिसेंबर रोजी

नामनिर्देशनपत्रांची छाननी मंगळवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत करण्यात येईल. ९ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. २१ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजतापासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल व २२ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येईल.

असे आहेत आतापर्यंत दाखल अर्ज

तालुका दाखल अर्ज

तेल्हारा ०३ ,अकोट ००, मूर्तिजापूर १०, अकोला ०७, बाळापूर ०४, पातूर ०४, बार्शीटाकळी ००, एकूण २८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT