farmer agricultural  sakal
अकोला

Akola News : कृषी समितीच्या सभेत २५ हजाराची शेतकऱ्यांना मदत द्यावी; जि.प. कृषी समितीच्या सभेत ठराव.

खरीप हंगामाच्या दुसऱ्याच महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांची प्रचंड हानी

सकाळ डिजिटल टीम

अकोला - खरीप हंगामाच्या दुसऱ्याच महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांची प्रचंड हानी झाली असून, शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, असा ठराव शुक्रवारी कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार शेत जमीन व पिकांसह एकूण एक लाख ४२ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

जुलै मध्ये १३, १९, २२ व २३ तारखेला अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली. आपत्तीमुळे तीन व्यक्ती मृत्यू पावल्या. पिकांच्या नुकसानाचे कृषी, महसूल व जि.प. तर्फे संयुक्त पंचनामे करण्यात येत आहेत. लवकरच नुकसानाचे अंतिम चित्र स्पष्ट हाेणार आहे.

शुक्रवारी झालेल्या कृषी समितीच्या सभेत नुकसान भरपाईबाबत चर्चा करून ठराव घेण्यात आले. सभेला सभापती योगिता रोकडे, प्रमोदीनी कोल्हे, अर्चना राऊत,नीता गवई,,वेणू डाबेराव,सुनंदा मानतकर,गीता मोरे, रायसिंग राठोड आदी सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती?

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

Alandi Spiritual Visit: आळंदीत चैतन्यमय वातावरण; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत बिट्टा यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT