आदिवासींवर चुकीच्या धोरणांमुळे अन्याय; आदीवासी परिषदेचा आराेप sakal
अकोला

अकाेला : आदिवासींवर चुकीच्या धोरणांमुळे अन्याय; आदीवासी परिषदेचा आराेप

राष्ट्रीय आदीवासी एकता परिषदेचा आराेप; जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे

सकाळ वृत्तसेवा

अकाेला : राज्य सरकारच्या चुकीच्या धाेरणांमुळे आदिवासींवर अन्याय हाेत असल्याचा आराेप करीत बुधवारी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन केले. आदिवासींवर हाेत असलेल्या अन्यायाला वाचा फाेडण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राज्यभर आंदाेलन करीत आहे. हे आंदाेलन तीन टप्प्यात झाले.पहिला टप्पा ता.१७ फेब्रुवारी २०२२, दुसरा टप्पा ता.२९ फेब्रुवारी आणि ता. ९ मार्च राेजी अंतिम टप्प्याचे आंदाेलन करण्यात आले.बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर झालेल्या आंदाेलनात बाबाराव साखरे, राहुल इंगळे, ॲड. सारंग निखाडे आदी सहभागी झाले.

या मागण्यांसाठी केले आंदोलन

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदतर्फे व्याघ्र प्रकल्प किंवा अन्य काेणत्याही प्रकल्पाच्या नावाखाली आदिवासींना विस्थापित करू नये, अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींना बेदखल करून गैर अनुसूचित क्षेत्रात पुनर्वसन करणे असंवैधानिक असून, आदिवासींच्या घटनात्मक अधिकाराची पालमल्ली करू नये, सामूहिक वनहक्क प्रलंबित दावे तातडीने निकाली काढण्यात यावेत, मुलभूत सुविधांअभावी ३७० आदिवासींचा मृत्यू झाला असून, त्यांच्या नातेवाईकांना प्रती परिवार पाच काेटी रुपये मदत द्यावी, आदिवासींवर दाखल खाेट्या केसेस रद्द कराव्यात, आदिवासींना जल, जंगल, जमिनीपासून त्यांना वंचित करण्यात येवू नये, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

Burnt Cash Found Kolkata : पश्चिम बंगालमध्ये कोट्यवधींच्या जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ! सुटकेसमध्ये भरलेला पैसा; टीएमसी नेत्याशी काय आहे कनेक्शन?

रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Shendurwada News : डॉ. प्रशांत पटारे यांचा रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रम! एका दिवसात १६ रोबोटिक शस्त्रक्रिया; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद....

SCROLL FOR NEXT