अकोला

द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते पिकांसाठी संजीवनी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गत काही काळात विविध कारणांनी जमिनीचे आरोग्य खालावत गेले असून, उत्पादकता दिवसागणिक कमी होत आहे. प्राप्त परिस्थितीत अधिक उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते ही पिकासाठी संजीवनी आहे. द्रवरूप खताच्या माध्यमातून जरी पिकाला दिली तरी, शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीमध्ये फरक पडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती केंद्राचे उद्‍घाटन कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्राच्या माध्यमातून अकोला कृषी विद्यापीठाने व्यावसायिक क्षेत्रात अजून एक पाऊल पुढे टाकले असून, शेतकऱ्यांना सुद्धा उच्चप्रतीचे सूक्ष्म अन्नद्रव्य मिळण्यास मदत होणार असल्याचे सुद्धा डॉ. विलास भाले यांनी सांगितले.

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते मुख्य अन्नद्रव्याच्या जमिनीतून शोषणास कशी मदत करतात याविषयी सखोल मार्गदर्शन केले. अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. विलास भाले होते तर डॉ. विलास खर्चे (संशोधन संचालक), डॉ. महेंद्र नागदेवे (अधिष्ठाता कृषी), डॉ. प्रकाश नागरे (अधिष्ठाता विद्या उद्यानविद्या), डॉ. सुधीर वडतकर (अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी), डॉ. सुरेंद्र काळबांडे (कुलसचिव), डॉ. प्रकाश कडू (विभाग प्रमुख) व डॉ. संदीप हाडोळे (प्रभारी अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती होती.

अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प मागील २५ वर्षांपासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत असून, हा प्रकल्पाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. या प्रसंगी सूक्ष्म अन्नद्रव्य प्रकल्पात मागील २५ वर्षापासून ज्या शास्त्रज्ञांनी व अधिकाऱ्यांनी भरीव योगदान दिले त्यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT