अकोला : शास्त्रीनगरात ‘लुसी’ने शोधला गांजा 
अकोला

अकोला : शास्त्रीनगरात ‘लुसी’ने शोधला गांजा

पोलिस पथकातील श्वानाच्या कामगिरीने अमली पदार्थ

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत अकोला पोलिस दलातील अंमली पदार्थ शोधक श्वान लुसीने गांजा विक्रेत्याला शोधून काढण्यात पोलिस पथकाची मदत केली. लुसीच्या कारवाईने अवैध धंदे करीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर संक्रात आली आहे.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील अंमली पदार्थ बाळगणे, विक्री करणे, तस्करी करण्यांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेत पोलिल दलाती श्वान पथकात कार्यरत अंमली पदार्थ शोधण्यात प्राविण्य असलेले श्नान लुसीची मदत होत आहे. मंगळवार, ता. ७ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखच्या पथकाने संशयीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याच्या घरची झाडाझडती घेण्यात आली.

खदान परिसरातील शास्त्री नगरातील शेख मुस्तफा शेख मकबुल (४०) याच्या घरात अंमली पदार्थ शोधक श्वान लुसीच्या मदतीने झडती घेतली असता २०० ग्रॅम प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजा ज्याची किंमत तीन हजार रुपये आहे, आढळून आला. आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस ॲक्टचे कलम २० (ब) दोन (३) प्रमाणे खदान पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पुढील तपासासाठी खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पोउपनि. गोपाल जाधव, एएसआय दशरत बोरकर, गोकूळ चव्हाण, लिलाधर खंडारे, शेख अन्सार, जोत्स्ना लव्हाळे, नफिस शेख, श्नान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मडावी, डॉग हॅन्डलर गणेश महल्ले यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT