कोरोना Esakal
अकोला

अकोला : मास्क, लस रोखेल कोरोनाचा नवीन संसर्ग!

स्वतःचे व कुटुंबाचे करा संरक्षण; मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली होती. त्याचवेळी तिसऱ्या लाटेची भितीही व्यक्त करण्यात आली होती. सुदैवाने अकोला शहर व जिल्ह्यात अद्याप तिसऱ्या लाटेची शक्यता दिसत नाही. मात्र, विदेशात व त्यानंतर महाराष्ट्रातही कोरोनाचा नवीन व्हेरियन्ट ओमीक्रॉन आढळल्याने संसर्गाची शक्यता वाढली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस प्रवाभी ठरणार असून, सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे मास्क वापरल्यास स्वतःसोबत कुटुंबाचेही संरक्षण करता येणार असल्याने लस घेणे आवश्यक असून, मास्कचा नियमित वापर करण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी केले आहे.

भारताबाहेर बऱ्याच देशांमध्‍ये कोरोनाचा नवीन व्‍हेरीयन्‍ट ओमीक्रॉनचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. हा व्हेरियन्ट धोकादायक नसला तरी संसर्गाचा वेग काळजी वाढविणारा आहे. कर्नाटक व काही राज्‍यासह महाराष्‍ट्रात सुध्‍दा कोरोनाच्‍या नवीन व्‍हेरीयन्‍ट ओमीक्रॉनचा संसर्ग झालेले रुग्‍ण आढळून आलेले आहे. हा नवीन व्हेरियन्ट अकोला शहरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. प्रत्‍येक नागरिकानी कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे खूप गरजेचे आहे.

जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या निकषानुसार सद्यास्थितीत प्रशासनाव्‍दारे देण्‍यात येणाऱ्या कोव्‍हीशील्‍ड आणि को-व्‍हॅक्‍सीन या दोन्‍ही लस कोरोनाच्‍या नवीन व्‍हेरीयन्‍टवर सुध्‍दा प्रवाभी आहे. त्यामुळे शहरातील प्रत्‍येक नागरिकानी लसीकरण करून घेणे व आपल्‍या परिवाराचे संरक्षण करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT