unlock trafic akola.jpg 
अकोला

मोठी बातमी : रस्त्यांवर उद्यापासून दिसणार हा बदल...जाणून घ्या संपूर्ण माहिती

सुगत खाडे

अकोला : कोरोना संसर्गाला ‘ब्रेक’ लावण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला टप्प्या-टप्प्याने उठवण्याचे जाहीर करत शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु केले आहे. त्याअंतर्गत नियम व अटींच्या अधीन राहून व्यापारी प्रतिष्ठाने सुरु करण्यात आली आहेत. त्यानंतर आता सोमवारपासून (ता. 8) अटी व शर्तींच्या अधीन राहून सार्वजनिक व खाजगी वाहतूक सुरु होणार आहे. 

नोव्हेल कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाने सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात 24 मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु आता राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यात 30 जूनपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्‍यात आला आहे. सदर लॉकडाउन प्रतिबंधीत क्षेत्रासाठीच लागू राहिल. असे असले तरी अर्थचक्राला गती देण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु करून घरांमध्ये कोंडलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांना नियम व अटींच्या अधीन राहून घराबाहेर पडण्यास सुट व व्यापार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मिशन बिगिन अगेन फेज-3 च्या अंतर्गत सोमवार (ता. 8) पासून सार्वजनिक व खाजगी वाहतूक सुरु होणार आहे, परंतु त्यासाठी नियम व अटींचे पालन वाहन चालकांसह प्रवाशांना करावे लागेल. 

चारचाकीत चालका व्यतिरीक्त दोनच प्रवाशी
० सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी गाडीमध्ये चालका व्यतिरीक्त इतर 2 प्रवाशी अनुज्ञेय राहतील. तीन चाकीगाडीमध्ये (उदा. ऑटो) चालका व्यतिरीक्त दोन प्रवाशीच प्रवास करु शकतील. 
० दुचाकीवर प्रवास करताना केवळ चालकाला परवानगी राहिल. दुसरा प्रवासी अनुज्ञेय राहणार नाही.
० आंतर जिल्हा बस वाहतूक करताना बस मधील एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना प्रवास करता येईल. त्यापूर्वी बस निर्जंतुकीकरण करावी लागेल. प्रवास करताना सोशल डिस्टेन्सिंगचे पालन सुद्धा बंधणकारक राहिल. 

सायंकाळी 5 पर्यंतच सुरु राहणार बाजारपेठ
लॉकडाउनमध्ये बंद असलेली दुकाने मिशन बिगिन अगेनमध्ये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु अत्यावश्‍यक सेवा, कृषी सेवा केंद्र वगळता इतर दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच नियमित सुरु राहतील. अशा वेळी दुकानामध्ये अथवा एका ठिकाणी जास्त गर्दी होत असल्याचे दिसून आल्यास संबंधित सक्षम प्राधिकारी (आयुक्त, महानगरपालीका, मुख्याधिकारी, सचिव, ग्रा.पं.) दुकान बंद करु शकतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT