Akola Leopard Attack Sakal
अकोला

Akola Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात कर्मचारी जखमी; नळगंगा धरणानजीकच्या रोपवाटिकेतील घटना

Forest Office Motala : रोपवाटिकेत सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी नारायण सैरीसे व काही रोहयो मजूर काम करतात.

सकाळ वृत्तसेवा

मोताळा : अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात सामाजिक वनीकरण विभागातील एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना नळगंगा धरणानजीकच्या रोपवाटिकेत २९ जूनच्या सायंकाळी घडली. नारायण श्रीराम सैरीसे (३०) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तालुक्यातील नळगंगा धरणानजीक सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी नारायण सैरीसे व काही रोहयो मजूर काम करतात.

२९ जूनच्या सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास सर्व मजूर कामावरून परत गेल्यावर नारायण सैरीसे हे रोपवाटिकेतून बाहेर निघत होते. दरम्यान, त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. यावेळी सैरीसे यांनी आरडाओरडा केला असता, नर्सरीसमोरून जाणाऱ्या काही नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र या हल्ल्यात नारायण सैरीसे यांच्या पाठीवर दुखापत झाली आहे. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल प्रशांत राजपूत व रोजगार सेवक संदीप मापारी यांनी जखमी नारायण सैरीसे यांना उपचारासाठी मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, सामाजिक वनीकरण आणि मोताळा वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

नर्सरीत दोन बिबट्यांचा मुक्तसंचार

तीन ते चार दिवसांपूर्वी नारायण सैरीसे यांना या रोपवाटिकेत दोन बिबट मुक्तसंचार करताना दिसून आले. यावेळी सैरीसे यांच्या सोबत असलेल्या नर्सरीतील कुत्र्यांनी बिबट्यांच्या दिशेने भुंकायला सुरुवात केली. तसेच सैरीसे यांनी आरडाओरडा केला.

त्यामुळे दोन्ही बिबट्यांनी पळ काढला. ही बाब सैरीसे यांनी मोताळा सामाजिक वनीकरणचे आरएफओ शिपे यांच्या कानावर घातली होती. परंतु यावर कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. त्यानंतर सैरीसे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. संबंधितांनी वेळीच उपाययोजना केली असती तर ही घटना घडली नसती, अशी चर्चा आहे.

या नर्सरीत रोहयो मजूर काम करतात. मी ग्राम रोजगार सेवक असून, दिवसातून दोन वेळा मजुरांची हजेरी घेण्यासाठी या नर्सरीत जातो. येथे बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू असल्याने परिसरात दहशत पसरली आहे. शासनाने आम्हाला विमा कवच प्रदान करावा. तसेच वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा.

- संदीप मापारी, ग्राम रोजगार सेवक, रा.चिंचपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT