NAFED  
अकोला

NAFED : शेतकऱ्यांना दिलासा! जिल्ह्याला शेतमाल खरेदीचे उद्दीष्ट मिळाले वाढवून

सकाळ वृत्तसेवा

अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीवर आधारित रब्बी हंगाम २०२२-२३ अतंर्गत नाफेडमार्फत जिल्ह्याला आणखी एक लाख क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शुक्रवार, १९ मे रोजी यासंदर्भात मार्केटिंग फेडरेशनचे एमडी सुधाकर तेलंग यांनी जिल्ह्यातील केंद्र संचालकांशी शासकीय विश्रामगृह येथे संवाद साधला.

जिल्ह्यातील दहा केंद्रांवर केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीवर आधारित रब्बी हंगाम २०२२-२३ अतंर्गत नाफेडमार्फत हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. गत १९ एप्रिल रोजी उद्दिष्ट संपल्यावरून खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. त्यानंतर राजकिय पक्ष व सामाजिक संघटनांनी चना खरेदी करण्यासाठी आवाज उठवला.

त्यानंतर जिल्ह्याला नव्याने ९१ हजार ९१४ क्विंटल वाढीव उद्दिष्ट शासनाकडून २७ एप्रिल रोजी मंजूर करण्यात आले. मध्यंतरी जिल्ह्यात सर्व दूर अवकाळी पावसाची हजेरी तसेच बारदाण्याची टंचाई यामुळे केंद्रांवरील खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली होती मात्र ८ मे रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी नव्याने आदेश काढून संबंधित केंद्रांना उद्दिष्ट ठरवून खरेदी बाबत आदेशित केले होते.

त्यानंतर १० पासून खरेदीची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. मात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांची खरेदी होणार का हा प्रश्न ऐरणीवर असतांना जिल्ह्याला आणखी एक लाख क्विंटलचे उद्दिष्ट मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे. मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक महेंद्रजी ढेकाणे यांनी खरेदीदार संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले.

एमडीनी साधला केंद्र संचालकांशी संवाद

दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकरजी तेलंग यांनी केंद्र संचालकांशी संवाद साधला. यावेळी मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक महेंद्र ढेकाणे, विभागीय व्यवस्थापक टिकेले, जिल्हा मार्केटिंग अधिकारी पी एस शिंगणे, एस एस सरप, तेल्हारा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश ढोले, पुंडलीकराव अरबट, नथूजी कापसे, बेलखेड फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष ॲड.सुधाकर खुमकर, विवरा येथील केंद्र चालक दीपक बोचरे, संतोष दांदळे, उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी; तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maratha Reservation: समाजापासून मला दूर ठेवण्याचा सरकारचा कट; माढ्यातील इशारा सभेत मनोज जरांगे यांचा आरोप, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार

अर्थभान : इमर्जिंग अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल

शाळांना यंदा ११ दिवस दिवाळी सुट्टी! शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे अन्‌ शिक्षकांना १२८ दिवस सुट्ट्या; यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर, वाचा...

Jharkhand Protest: झारखंडमध्ये भरती परीक्षांवरून आंदोलन पेटले; विद्यार्थी संघटना सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम

SCROLL FOR NEXT