One lakh has been stolen from a grocery shop in Motala city 
अकोला

किराणा दुकानात एक लाखाची चोरी; मोताळा शहरातील घटना, गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

मोताळा  (बुलडाणा) : येथील आठवडी बाजार चौकातील क्वालिटी किराणा दुकान फोडून एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता.११) सकाळी उघडकीस आली. प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
मोताळा येथील रफिक खां नथ्थे खां (४२) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांची आठवडी बाजार चौकात क्वालिटी किराणा दुकान आहे. रफिक खां हे बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या छतावरील टिनपत्र्याचा मागील बाजूने नटबोल्ट खोलून आत प्रवेश केला व दुकानातील झंडू बाम एक बॉक्स (किंमत १२ हजार ६०० रुपये), उंट बिडी चार बॉक्स (किंमत ७० हजार ५६० रुपये), शिवाजी बिडी एक बॉक्स (किंमत १८ हजार रुपये) असा एकूण एक लाख एक हजार १६० रुपयांचा ऐवज लंपास केला. रफिक खां यांनी गुरुवारी सकाळी दुकान उघडले असता, सदर प्रकार उघडकीस आला.

या घटनेमुळे परिसरातील व्यापार्‍यांमध्ये भीती पसरली आहे. मागील काही दिवसांपासून मोताळा शहरासह परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी येथील सुरसंगम मोबाईल शॉप फोडून चोरट्यांनी तब्बल पाच लाखांचा ऐवज लंपास केला होता. विशेष म्हणजे चोरट्यांनी मुख्य चौकातील दुकानांना लक्ष्य करून पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. याप्रकरणी रफिक खां नथ्थे खां यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गरुड, एपीआय राहुल जंजाळ यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ मिलिंद सोनुने करीत आहेत. 

चोरटा सीसी कॅमेर्‍यात कैद
 
क्वालिटी किराणा दुकान फोडणारा एक चोरटा पाठीमागील शाह किराणाच्या सीसी कॅमेर्‍यात कैद झाला आहे. सडपातळ शरीर बांधा असलेला हा चोरटा दुकानाच्या पाठीमागून दोन चकरा मारताना दिसतो. त्यानंतर पोतडीत मुद्देमाल नेताना दिसून येतो. मध्यरात्री तीन ते सव्वा तीन वाजताचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे. यावरून पोलिसांना चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास मदत मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Fertility Rate Decline : भारताचा जन्मदर घटला, इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; लोकसंख्या संकटाची चाहूल?

राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब, पुतण्याला मंत्रिपदाची चर्चा; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागेसाठी निर्णय

सरकारी बाबूची २७ वर्षे नोकरी; ३ टोलेजंग इमारती, २ आलिशान बंगले, १३ प्लॉट; २ कोटींची रोकड, सोने-चांदी अन् जमिनीची मोजणी बाकी

Nagpur: विकास हवाच, पण पर्यावरणही जपणे आवश्यक; सिमेंटीकरण, प्रदूषण व वृक्षतोडीमुळे उपराजधानीचा पारा ‘हाय’

Latest Marathi News Live Update : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान

SCROLL FOR NEXT