crime case vasai crime news crime case
अकोला

अकोला जिल्ह्यात मालमत्ता गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले!

अकोला जिल्ह्याची सन २०२१ मध्ये चोरी गेलेली मालमत्तेसंबंधित ९४७ मालमत्तेचे गुन्हे दाखल झालेत. त्यापैकी ५४१ गुन्हे उघडकीस आले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला जिल्ह्याची सन २०२१ मध्ये चोरी गेलेली मालमत्तेसंबंधित ९४७ मालमत्तेचे गुन्हे दाखल झालेत. त्यापैकी ५४१ गुन्हे उघडकीस आले.

अकोला - पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्वात अकोला पोलिस दलात अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आलेत. त्यासोबतच जिल्ह्यातील गुन्ह्यांचा (Crime) आलेखही कमी कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे वर्षभरात अकोला पोलिसांची मालमत्ता (Police Property) संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्याची कामगिरी उंचालवली आहे. वर्षभरात तब्बल ५४१ गुन्हे उघडकीस आणण्यात अकोला पोलिसांना यश आले.

अकोला जिल्ह्याची सन २०२१ मध्ये चोरी गेलेली मालमत्तेसंबंधित ९४७ मालमत्तेचे गुन्हे दाखल झालेत. त्यापैकी ५४१ गुन्हे उघडकीस आले. सन २०२० च्या तुलनेत सन २०२१ मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण सात टक्क्यांनी वाढले आहे. गुन्हे उघडकीस आणल्यानंतर एकूण दोन कोटी ४८ लाख ८१ हजार ६६४ रुपयांची मालमत्ता हस्तगत केली. मालमत्ता हस्तगतचे प्रमाण आठ टक्क्यांनी वाढले आहे.

वर्षभरात ३६ खून

सन २०२० मध्ये अकोला जिल्ह्यात एकूण ४१ खुनाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यातुलनेत सन २०२१ मध्ये एकूण ३६ गुन्हे दाखल झालेत. खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यांमध्ये सन २०२० मध्ये एकूण ६२ गुन्हे दाखल झाले होते. सन २०२१ मध्ये एकूण ४० गुन्हे दाखल असून, खुनाचा प्रयत्न कतरण्याच्या गुन्ह्यांमध्ये २२ गुन्ह्यांची घट नोंदविल्या गेली आहे.

एलसीबीकडून २२४ गुन्ह्यांचा यशस्वी तपास

स्थानिक गुन्हे शाखेने सन २०२० मध्ये ११८ गुन्हे उघडकीस आणले होते. सन २०२१ मध्ये या विभागाची कामगिरी उंचावली असून, एकूण २२४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सन २०२० मध्ये ५२ लाख ४६ हजार ७०७ रुपयांची मालमत्ता हस्तगत केली होती. सन २०२१ मध्ये स्थागुशाने दोन कोटी ३५ लाख १४ हजार २८ रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

SCROLL FOR NEXT