भरडधान्य खरेदी sakal
अकोला

अकोला जिल्ह्यात सात केंद्रांवर भरडधान्य खरेदी

आधारभूत खरेदी योजना; ३१ जानेवारीपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अकोला जिल्ह्यातील सात केंद्रांवर भरडधान्य खरेदी केली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला जिल्ह्यातील सात केंद्रांना मान्यता दिली.खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्ये खरेदीच्या आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा, या हेतूने जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. खरीप पणन हंगाम २०२१-२२ दि. ७ डिसेंबर २०२१ ते दि.३१ जानेवारी २०२२ असा असेल असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील खरेदी केंद्र

  • तालुका सब एजंट संस्थेचे नाव केंद्राचे नाव

  • अकोला अकोला ता.सह.शेतकी खरेदी विक्री संघ अकोला

  • अकोट अकोट ता. सह.शेतकी खरेदी विक्री संघ अकोट

  • पातुर पातुर ता. सह.शेतकी खरेदी विक्री संघ पातुर

  • बार्शीटाकळी बार्शीटाकळी ता. सह.शेतकी खरेदी विक्री संघ बार्शीटाकळी

  • मूर्तिजापूर मूर्तिजापूर ता. सह.शेतकी खरेदी विक्री संघ मूर्तिजापूर

  • तेल्हारा तेल्हारा कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती तेल्हारा

  • बाळापूर बाळापूर ता. सह.शेतकी खरेदी विक्री संघ बाळापूर

    धान्य खरेदीचे आधारभूत दर

  • पीक आधारभूत किंमती (रुपये) प्रत्यक्ष द्यावयाचा दर (रुपये)

  • मका १८७० १८७०

  • ज्वारी (संकरीत) २७३८ २७३८

  • ज्वारी (मालदांडी) २७५८ २७५८

  • बाजरी २२५० २२५०

  • रागी ३३७७ ३३७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT