Shirpur Women cleaned Chandrabhaga River Pandharpur  
अकोला

अकाेला : शिरपूरच्या सेवेकरी महिलांनी केली चंद्रभागेची स्वच्छता

श्री क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची सफाई

संतोष गिरडे

शिरपूर - शिरपूर येथील सेवेकरी महिलांच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची साफसफाई करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त पार पडलेल्या भव्यदिव्य कार्यक्रमानंतर २३० महिलांनी१५ ते १९ जुलै दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची सफाई केली.

यासाठी शिरपूर येथील रवि पुरी या युवकाने पुढाकार घेतला. रवी पुरी या युवकाने गत ३ वर्षापासून शिरपूर येथील जानगिर महाराज संस्थान परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली, त्या वेळी या कामात महिलांना सहभागी करून घ्यावे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्याकरिता त्यांनी महिलांशी संपर्क केला. महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज ७५० महिला या सामाजिक कार्यात सहभागी आहेत. तेव्हापासून ते शिरपूर शहरातील श्रीजानगीर महाराज संस्थान, खंडोबा संस्थान, बेलसरी महादेव संस्थान, नागनाथ संस्थान, मिर्झामियाँ दर्गा आदी ठिकाणी तर मकर संक्रांत, एकादशी, महाशिवरात्र, नवदुर्गा उत्सव यासह संस्थानातील इतर उत्सवाच्या वेळी ते मंदिर परिसराची साफसफाई करतात.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीची सफाई करण्याचा विचार त्यांच्या मनात आला, त्यासाठी त्यांनी महिलांशी चर्चा केली, महिलांचा होकार मिळताच ते २३० महिलांना घेऊन ते चंद्रभागा नदी परिसराची सफाई करण्यास गेले. त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त पार पडलेल्या उत्सवानंतर पंढरपूर येथील चंद्रभागा सफाई करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. समाजसेवेचे हे व्रत ते पुढेही चालू ठेवणार आहेत.

रवी पुरी या होतकरू युवकाने समाजसेवेचा वसा घेऊन स्वच्छ अभियान करण्याचा विडाच उचलला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तर या कार्यातून आनंद मिळत असल्याचे रवी पूरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT