Akola Crime News Esakal
अकोला

Akola Crime News: जन्मदात्यांवर कुऱ्हाडीचे घाव; आई जागीच ठार तर वडील गंभीर, धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime News: आई-वडीलांना घरातील खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केले. यात आईचा जागीच मृत्यू झाला. वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Akola Crime News: आई-वडीलांना घरातील खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केले. यात आईचा जागीच मृत्यू झाला. वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरपना तालुक्यातील लोणी या गावात बुधवार (ता. २१) दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृत आईचे नाव कमलाबाई पांडुरंग सातपुते (वय ७० रा. लोणी) असे आहे. वडीलांचे नाव पांडुरंग सातपुते (वय ७८) आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मुलगा मनोज पांडुरंग सातपुते (वय ४५) याला अटक केली. शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशातून हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

कोरपना तालुक्यात लोणी हे दीड ते दोन हजार लोकसंख्येचे गाव. याच गावात सातपुते कुटुंबीय राहतात. पांडुरंग सातपुते यांच्याकडे वीस एकर शेती आहे. त्यांना दोन मुले आणि दोन मुली. शेतीचे हिस्से त्यांनी केले. दोन्ही मुलांना पाचपाच एकर शेती दिली. उर्वरित शेती आपल्याकडे ठेवली. ती त्यांनी ठेक्याने दिली. ठेक्याने मिळालेल्या पैशातून पांडुरंग सातपुते घर चालवायचे. त्यांची दोन्ही मुले गावात वेगवेगळी राहायची. काही दिवसांपूर्वीच पांडुरंग सातपुते यांना शेतीच्या ठेक्याचे पैसे मिळाले होते.

ठेक्याचे पैसे मुलगा मनोज सातपुते याने वडिलांकडे मागितले होते. मात्र, वडिलांनी पैसे देण्यात नकार दिला होता. त्यामुळे मनोजच्या डोक्यात पैसे न दिल्याचा राग गेल्या काही दिवसांपासून होता. बुधवार (ता.२१) दुपारच्या सुमारास मनोज घरी आला. तेव्हा आई कमलाबाई आणि वडील पांडुरंग घरातील एका खोलीत बसून होते. दोघेही एकाच खोलीत बसल्याचे बघून तेथे मनोज शिरला. त्याने खोलीचे दार बंद केले.

अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात आई जागीच ठार झाली. त्यानंतर त्याने पांडुरंग सातपुते यांच्या डोक्यावर वार केले. वडीलांना जखमी करून तो वहिनीच्या मागे धावला. मात्र ती एका खोलीत लपून बसली. त्याचे दारही तिने लावले. त्यामुळे तिचा जीव वाचला. आई, वडील दोघेही खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. त्यानंतर मनोजने तेथून पळ काढला.

मुलाने केलेल्या हल्ल्यात वडील पांडुरंग सातपुते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रारंभी कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेतीच्या ठेक्याच्या पैशातून ही घटना घडली आहे. आरोपीला गजाआड करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे, असं संदीप एकडे, ठाणेदार कोरपना यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT