Akola Crime News  sakal
अकोला

Akola Crime News : सट्टेबहाद्दरांवर तेल्हारा पोलिसांची कारवाई

शहरातील टॉवर चौकात काही इसम पैसे हातजीतवर सध्या चालू असलेल्या आयपीएल सामन्यावर मोबाईलवरून सट्टा खेळणाऱ्या आरोपींना शहर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा : शहरातील टॉवर चौकात काही इसम पैसे हातजीतवर सध्या चालू असलेल्या आयपीएल सामन्यावर मोबाईलवरून सट्टा खेळणाऱ्या आरोपींना शहर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, तेल्हारा शहरातील टॉवर चौकातील कैलास हॉटेलजवळ काही इसम पैसे हारजीतवर सध्या चालू असलेल्या आयपीएल सामन्यावर मोबाईलवर सट्टा खेळत आहेत.

खात्रीलायक मिळालेल्या माहितीच्या आधारे एसडीपीओ, अकोट यांचे पथकाने घटनास्थळी धाड टाकली असता, काही इसम त्याठिकाणी आढळून आले. त्यांची झडती घेतली असता, सोनू शिवदास जिंदे (वय २९ रा.तेल्हारा) याचेजवळून दोन मोबाईल, एक लॅपटॉप व रोख एक हजार ६२० रुपये, हरिओम शिवशंकर अवचारकडून एक मोबाईल किंमत ४० हजार रुपये, दिनेश ओमप्रकाश छांगाणी याचेकडून एक मोबाईल किंमत १७ हजार रुपये, तुषार शर्मा याचेजवळून एक मोबाईल किंमत २० हजार रुपये, निखील ठाकूर जवळून एक मोबाईल किंमत १५ हजार रुपये, बबलू ठाकूर जवळून एक मोबाईल किंमत १६ हजार रुपये, असा एकूण एक लाख ८४ हजार ६२० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT