अकोला

Accident: आकोल्यात भीषण अपघात, भरधाव कार हॉटेलात घुसली; कामगाराचा जागीच मृत्यू

Vidharbha Accindet update: पातूर पोलिस स्टेशनजवळ ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

योगेश फरपट

Akola Accident latest news : पातुर शहरात नागरिकांनी भरधाव कारचा थरार अनुभवला. पातूर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये कार घुसल्याने पाणी भरत असलेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच. 32 वाय 2465 क्रमांकाच्या मारुती अल्टो कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव व निष्काळजीपणे चालवुन जुन्या बस स्थानकावरील एका हॉटेलमध्ये कार घुसवली. तेवढ्यात कार समोर पाणी भरण्यासाठी जाणारा कामगार कार खाली चिरडला गेला. सुरुवातीला त्याला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने अकोला येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते.

मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अभिजीत शिंदे रा. भंडाराज ता. पातुर असे मृतकाचे नाव आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराची कोणतीही चूक नसताना कारचालकाच्या चुकीमुळे आपला प्राण गमवावा लागला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया घटनास्थळी नागरिकांनी व्यक्त केल्या. पोलिसांनी या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिस पोहोचेपर्यंत कारचालक पसार..

घटनास्थळी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे. अपघातातील मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कारचालकास घटनेनंतर काही नागरिकांनी पकडून ठेवले होते. मात्र पोलीस पोहचेपर्यंत आरोपी पसार झाला होता असे पातुर पोलिसांनी सांगितले. हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी जर पोलीस वेळेत पोहोचत नसतील तर पातुर पोलीस किती कर्तव्यदक्ष आहेत याचा अंदाज येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मिठाई विकत घेण्याआधी हा व्हिडिओ पाहा ! आवडीने कचोरी विकत घेतली, घरी जाऊन पॅकेट उघडून पाहिले तर... धक्कादायक प्रकाराने खळबळ

Heat Risk : शहरी भागात उष्णतेचा धोका वाढला! ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ; आयआयटीएमचा अहवाल

JOB IN TEAM INDIA : वैभव सूर्यवंशीसोबत काम करण्याची संधी! भारतीय संघात ५ पदांसाठी भरती; BCCIने मागवलेत अर्ज, करा अप्लाय

Marathi News Live Updates : हिंगणघाटमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटरविरोधात जनआक्रोश मोर्चा

Numerology: Love Marriage की Arranged? 'या' ३ मूलांकांच्या लोकांचे जुळतात सर्वाधिक प्रेमविवाह; जाणून घ्या जन्मतारखेत दडलेलं लग्नाचं रहस्य!

SCROLL FOR NEXT