Transfers of 20 percent employees of zilla parishad panchayat samiti akola sakal
अकोला

Akola News : जि.प.च्या २० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या

२५ व २६ मे रोजी समुपदेशनाने राबविण्यात आली बदल्यांची प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या पंचायत समित्यांमध्ये कार्यरत वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या बदल्याचा बिगुल वाजला आहे. त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया २५ व २६ मे रोजी जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात पार पडेल. ही प्रक्रिया समुपदेशनाने पार पडणार असून १० टक्के बदल्या प्रशासकीय तर १० टक्के बदल्या विनंतीवर करण्यात येतील.

राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात राज्य प्रशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या कमी प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासोबतच बदल्यांची प्रक्रिया ३१ जुलै २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या पंचायत समित्यांमधील बदल्यांची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पार पडली होती.

२०२१ मध्ये झालेल्या बदली प्रक्रियेदरम्यान दहा टक्के प्रशासकीय तर पाच टक्के विनंतीवर बदल्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान यावेळी मात्र २० टक्के बदल्या करण्यात येणार आहेत. त्यामध्ये १० टक्के प्रशासकीय तर १० टक्के बदल्या विनंतीवर करण्यात येतील. जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात ही प्रक्रिया पार पडेल.

बदल्यांपूर्वी कर्मचाऱ्यांचे समूपदेश करण्यात येईल. बदली प्रक्रियेदरम्यान जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, संबंधित विषय समितीचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित राहतील. यंदा मोठ्या प्रमाणात बदल्या होत असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर काही कर्मचारी सोयीच्या ठिकाणी बदल्या मिळाव्या यासाठी प्रयत्नात आहेत.

अशा करणार बदल्या

कृषी, अर्थ, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, लघुसिंचन व महिला आणि बाल कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या २५ मे रोजी करण्यात येतील. सकाळी १० वाजतापासून ही प्रक्रिया सुरु होईल.

सामान्य प्रशासन, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण व ग्रामपंचायत विभागाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या २६ मे रोजी करण्यात येतील. ही प्रक्रिया सकाळी १० वाजतापासून होईल व टप्प्या-टप्प्याने बदल्यांची प्रक्रिया पार पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT