Police Patil Recruitment  Sakal
अकोला

Police Patil Recruitment : वाशीम जिल्ह्यात पोलिस पाटलांची २५० पदे रिक्त

Washim 250 Police Patil Post Vacant : वाशीम जिल्ह्यातील तब्बल २५० च्या वर पोलिस पाटील पदे रिक्त आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- राम पाटील वानखेडे

केनवड : वाशीम जिल्ह्यातील तब्बल २५० च्या वर पोलिस पाटील पदे रिक्त आहेत. महसूल आणि पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलिस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलिस पाटील करीत असतात. परंतु पोलिस पाटलांविना रिक्त असलेल्या गावांचे कामकाज बाधित होत आहे.

रिक्त जागांमुळे एका पोलिस पाटलाकडे चार ते पाच गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे. गावात पोलिस पाटील उपलब्ध नसल्याने सर्वाधिक अडचण पोलिस प्रशासनाला व ग्रामस्थांना होत आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यासाठी गावातील कुणी पुढाकार घेत नाही.

गावातील सामाजिक, राजकीय वातावरण, नेत्यांच्या भेटी, कायदा व सुव्यवस्था याबाबत गोपनीय अहवाल प्रशासनाला मिळेनासे झाले आहेत. राज्य शासन पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत चालढकल करीत आहे.

ज्या गावात पोलिस पाटील पद रिक्त आहे, त्या ठिकाणी लगतच्या गावातील पोलिस पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अशा गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती पोलिस पाटील यांच्याकडून शासनाला दिली जाते.

गावात शांतता राखण्याचे कामही याच पोलिस पाटलांच्या खांद्यावर असते. त्याचबरोबर शासकीय कामांसाठी पोलिस पाटलांकडून रहिवासी दाखला घ्यावा लागतो. त्यामुळे पोलिस पाटलाविना स्थानिक नागरिकांची कामे प्रभावित झाली आहेत.

राज्य शासनाकडे पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरण्यात यावी या करिता सातत्याने पाठपुरावा पोलिस पाटील संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे, परंतु शासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे आम्हाला तीन-तीन गावांचा पोलिस पाटील पदाचा कारभार सांभाळावा लागत आहे.

-माणिक खराटे, पोलिस पाटील केनवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे महसूल विभागात खळबळ! ‘कलम 155’ गैरवापरप्रकरणी 69 अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू; 15 जण आधीच निलंबित

FIFA World Cup: मेस्सीने ज्याला अंगाखांद्यावर खेळवले, तोच विरोधात उभा राहणार! Final मध्ये आश्चर्याची गोष्ट दिसणार

Latest Marathi News Live Update : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पाठिंबा

सीता के पती...; कुणाल कामराने जंतर-मंतरवर केलेल्या विधानाने नवा वाद, अभिजीत दीपकेवरही होतेय टीका

Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ५ तर भाजपला फक्त एक जागा; कोणाची लागणार वर्णी?

SCROLL FOR NEXT